नेवासा-: ज्या ऑनलाइन पूजा अॅप गैरव्यवहाराने शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ बरखास्त झाले, त्या अॅप गैरव्यवहारातील दोन आरोपींचा जामीन नेवासे येथील जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. या प्रकरणात शनैश्वर देवस्थानचे दोन कर्मचारी अटक आहेत. मात्र संशयित पदाधिकारी, कर्मचारी व अन्य सहभागी व्यक्ती बाहेर असल्याचे कारण ग्राह्य धरून जामीन फेटाळण्यात आला आहे.विधिमंडळात सात महिन्यांपूर्वी आमदार विठ्ठल लंघे व आमदार सुरेश धस यांनी शनैश्वर देवस्थान भ्रष्टाचार, कोट्यावधी रुपायाचा झालेला अॅप गैरव्यवहार व बेकायदा नोकर भरतीबाबत लक्षवेधी मांडली होती. १२ जुलै २०२५ रोजी शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सायबर शाखेने ४ डिसेंबर २०२५ रोजी शनैश्वर देवस्थानच्या सीसीटीव्ही विभागातील संजय तुळशीराम पवार (रा. सोनई) व सचिन अशोक शेटे (रा. शनिशिंगणापूर) या दोघास अटक केली होती. ५ डिसेंबर रोजी दोघास पोलिस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडी भेटली होती.न्यायाधीश हरिभाऊ वाघमारे यांच्या पुढे झालेल्या सुनावणीत अतिरिक्त सरकारी वकील अॅड. विष्णुदास भोर्डे यांनी बाजू मांडली. आरोपींकडून अॅड. ए. बी. अंबाडे व अॅड. यु. एम. मोटे यांनी बाजू मांडली. दोन्ही युक्तिवाद ऐकून न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे.
अॅप गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी आहे. यामध्ये शनैश्वर देवस्थानचे अन्य पदाधिकारी किंवा कर्मचारी आहेत काय? याचा शोध राहिला आहे. याशिवाय उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर आत्महत्या केली असल्याने त्याबाजूने तपास करायचा असल्याचे न्यायालयापुढे सांगण्यात आले.
– अॅड. विष्णुदास भोर्डे, अतिरिक्त सरकारी वकील

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

