नेवासा – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भानसहिवरे ता. नेवासा जि. अहिल्यानगर शाळेमध्ये स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून नेवासा पंचायत समितीचे उपासभापती किशोर जोजार हे होते. मान्यवरांच्या हस्ते
प्रतिमापूजन करण्यात आले
शाळेचे मुख्याध्यापक राजेश जगताप यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. व राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर सखोल माहिती दिली .

यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना उपासभापती किशोरभाऊ जोजार यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनचारित्रावर मार्गदर्शन केले व स्वामी विवेकानंद यांचा आदर्श सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा व आपल्या जीवनात प्रगती करावी गावाचे,शाळेचे नाव उज्वल करावे असे सांगितले. शाळेला भौतिक सुविधासाठी पाहिजे ती मदत करू,मुख्याध्यापक
राजेश जगताप सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक अतिशय मेहनत घेत असून विध्यार्थ्याची गुणवंत्ता अतिशय चांगली असल्याचे मत व्यक्त केले.यावेळी व्यासपीठावर ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार जाधव, सोसायटीचे संचालक सुभाष मकासरे,बापू जाधव उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे झाली., जानवी टाके हिने जिजाऊच्या कार्यावर भाषण केले. ओम पवार याने छान असा पोवाडा गायला. उपसभापती किशोर भाऊ जोजार यांच्या वतीने विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आली.
सूत्रसंचालन अशोक ढोले यांनी केले.
राजेंद्र पाचे,श्रीधर साळुंके, आशा गवळी, सुमन सोळसे, महेश देवतरसे, वर्षाताई कुऱ्हाडे उपस्थित होते
आभार दत्तात्रय चोथे यांनी मानले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

