12 जानेवारीपासून थकबाकीदारांवर कारवाईचे दिले संकेत!
नेवासा – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयाने दिलेल्या आदेशानुसार आणि कार्यकारी अभियंता (अहिल्यानगर, ग्रामीण विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा तालुक्यात थकीत वीज बिल वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. दिनांक 12 जानेवारी 2026 पासून या मोहिमेला सुरुवात होत असून थकबाकीदार ग्राहकांचा विजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई केली जाणार आहे. नेवासा तालुक्यातील वाणिज्य आणि औद्योगिक तसेच घरगुती अशा तिन्ही वर्गातील ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणावर विज बिल थकले आहे.

वारंवार सूचना देऊनही थकबाकीचा भरणा होत नसल्याने प्रशासनाने आता कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तालुक्यात ठीकठिकाणी विशेष पथके तैनात करण्यात आले आहेत. ज्या ग्राहकांनी थकबाकी भरलेली नाही, त्यांचा विजपुरवठा खंडित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चालू वीजबिला बरोबरच थकबाकी वसूल करण्यावर भर दिला जाणार असल्याचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण काकडे तसेच उपकार्यकारी अभियंता राहुल बडवे यांनी सांगितले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

