तेलकुडगाव – समीर शेख | तेलकुडगाव येथील घाडगे पाटील माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम नुकताच उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध चित्रपट गीतकार, अभिनेते, निसर्ग-कवी पटकथा लेखक बाबासाहेब सौदागर उपस्थित होते.अध्यक्षस्थानी त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे विश्वस्त चेतन चव्हाण पाटील होते तर समवेत विश्वस्त दादा पाटील घाडगे,विश्वस्त अण्णा पाटील घाडगे, कारखान्याचे संचालक मच्छिंद्र पाटील म्हस्के,माजी सरपंच गोरक्षनाथ घोडेचोर, काका पाटील काळे,सरपंच सतिषराव काळे,सचिव मनीष घाडगे पाटील, चेअरमन अरुण पाटील घाडगे,काव्यरत्न प्रा. रावसाहेब राशिनकर,सखाराम काळे पाटील केंद्रप्रमुख कमल लाटे, ढोरजळगाव टिपीएस चे प्रशासक सचिन कर्डिले,नेवासा टिएमएस विभागप्रमुख नामदेव ताके,प्रशासक मनिषा राऊत,प्राचार्य भाऊसाहेब दुधाडे,विभाग प्रमुख प्रवीण गोर्डे,अतुल कराड, आबासाहेब घाडगे,बाळासाहेब काळे,आकाश थावरी ,पंचक्रोशीतील व वसतीगृहातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विश्वस्त चेतन चव्हाण यांनी यावेळी आपल्या मनोगतातून सर्वप्रथम स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीच्या शुभेच्छा देत कुठल्याही यशापयशाचा विचार न करता स्पर्धेमध्ये उतरावे तसेच आपल्या दृष्टिकोनामध्ये बदल करून कायम संघर्ष करावा व यशश्री प्राप्त करावी असा संदेश दिला.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कवी बाबासाहेब सौदागर म्हणाले की मनातून माणुसकीचा ओलावा असणारी माणसं शैक्षणिक तीर्थक्षेत्र निर्माण करतात, शैक्षणिक क्षेत्रात घाडगे पाटलांचा काम अतुलनीय आहे. सांस्कृतिक-अपंगत्वाची पार्श्वभूमी असताना,दिशा बदली की.. आपोआपच.. दशा बदलते. शिक्षण संस्था उभारणे व ती सक्षमपणे चालवणे म्हणजे जळते निखारे पदरात घेऊन चालावे लागते व ते काम घाडगे पाटलांची पुढची पिढी समर्थपणे पेलत आहे.ज्येष्ठांचे मार्गदर्शन हे नेहमी न लिहिलेल्या समृद्ध ग्रंथांचे अनुभव देत असतात त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिमूर्तीच्या शिक्षणाच्या गंगेचा प्रवाह अविरत चालत राहणार असे आश्वासित केले.

याप्रसंगी इयत्ता दहावी व बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.वर्षभरातील विविध परीक्षा व स्पर्धांमधील सर्व गुणवंतांचा सन्मानही मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.
प्रविण चौधरी यांचे संतकृपा मंडप साऊंड सिस्टीम आणि बाळासाहेब काळे यांनी ड्रोन व फोटोग्राफी व शुटिंग चे काम उत्तम प्रकारे पार पाडले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी तेलकूडगाव येथील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलातील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन जेष्ठ शिक्षक शरद कराड यांनी केले संचालन प्रा.नानासाहेब बांदल, गणेश काळे,रेणुका काळे,जयश्री भांगे यांनी केले तर आभार प्रशासक मनिषा राऊत यांनी मानले.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

