नेवासा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदासाठीची निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. काही दिवसांपूर्वी नेवासा नगरपंचायतीसाठी नगराध्यक्ष व 17 नगरसेवक पदांची निवडणूक प्रक्रिया पार पडली होती.
या निवडणुकीत महायुतीकडून डॉ. करणसिंह घुले यांची नगराध्यक्षपदी निवड झाली होती. नगरसेवकांमध्ये महायुतीचे सहा, क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे दहा तर एक अपक्ष नगरसेवक असा एकूण 17 नगरसेवकांचा समावेश आहे.

आज, दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी उपनगराध्यक्ष पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत सौ. शालिनीताई संजय सुखदान यांना एकूण 10 मते मिळाली आणि त्यांचा 2 मतांनी विजय झाला.
याचबरोबर क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून राजेंद्र काळे व महायुतीकडून डॉ. मनीषा वाघ यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली आहे.
या निवडीमुळे क्रांतिकारी शेतकरी पक्ष व आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीमुळे आम आदमी पार्टीचा महाराष्ट्रातील पहिला उपनगराध्यक्ष निवडून आल्याने पक्षाचे राज्यात अधिकृत खाते उघडले गेले असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
ही निवडणूक नेवासा नगरपंचायतीच्या राजकारणात महत्त्वाची ठरणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

