अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथील ज्ञानोदय इंग्लिश स्कूलने शासकीय चित्रकला परीक्षा 2025-26 मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.एलिमेंटरी परीक्षेत 93.18% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, इंटरमिजिएट परीक्षेत 100% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
एलिमेंटरी परीक्षेत 44 विद्यार्थ्यांपैकी 6 विद्यार्थ्यांनी A ग्रेड, 10 विद्यार्थ्यांनी B ग्रेड, आणि 25 विद्यार्थ्यांनी C ग्रेड मिळवली आहे. इंटरमिजिएट परीक्षेत 34 विद्यार्थ्यांपैकी 4 विद्यार्थ्यांनी A ग्रेड, 9 विद्यार्थ्यांनी B ग्रेड, आणि 20 विद्यार्थ्यांनी C ग्रेड मिळवली आहे.

या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष मा. रा. ह. दरे, उपाध्यक्ष मा. डॉ. विवेकजी भापकर, सचिव मा. ॲड. विश्वासराव आठरे पाटील, सहसचिव मा. श्री. मुकेशजी मुळे, खजिनदार मा. ॲड. दीपलक्ष्मी म्हसे मॅडम, मुख्याध्यापक मा. श्री. रावसाहेब चौधरी, पर्यवेक्षिका श्रीम. सुनिता दिघे मॅडम यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना कलाशिक्षक श्री. प्रकाश पटेकर व कपिल चिंतामणी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

