राजेंद्र काळे यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड.
नेवासा (प्रतिनिधी ) नेवासा
नगर पंचायतीमध्ये माजी मंत्री शंकरराव गडाख गटाचे नगरसेवक पदाचे बहुमत असून
त्यांचे 10 सदस्य निवडून आलेले आहेत तर विरोधी गटाचे अपक्षासह
7 नगरसेवक.
बुध दि 14 जाने रोजी नेवासा नगरपंचायतची उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक प्रकिया पार पाडली
यामध्ये क्रांतीकारी शेतकरी पक्ष व आम आदमी पक्षाच्या उमेदवार सौ शालिनी संजय सुखधान व विरोधी उमेदवार प्रवीण सरोदे यांच्या निवडणूक होऊन
सुखधान यांना 10 तर सरोदे यांना 8
मते मिळाली सदर मतदान प्रकिया हात उंचावुन करण्यात
आली
यात सौ शालिनी संजय सुखधान
यांची उपनगराध्यक्षपदी तर राजेंद्र कारभारी काळे यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड
करण्यात आली

क्रांतिकारी पक्षाचे 9 सदस्य असताना देखील
परंतु त्यांनी आम आदमी पक्षाच्या नगरसेविका शालिनी सुखधान याना उपनगराध्यक्ष पदाची संधी दिली त्यांच्या क्रांतिकारी निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
याप्रसंगी क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे गटनेते जितेंद्र कु-हे,नगरसेवक संभाजी धोत्रे,स्वप्नील मापारी,
नगरसेविका जयश्री शिंदे, नसरीन शेख,सोनल चव्हाण,शहिदाबी पठाण,शोभा व्यव्हारे ,प्रतिभा गवळी
यांच्या उपस्थितीत ही निवड प्रकिया पार पडली
नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सौ शालिनी सुखधान व स्वीकृत नगरसेवक राजेंद्र काळे यांचा
सत्कार अर्थ व पशुसंवर्धन समितीचे मा सभापती सुनीलराव गडाख,मा सभापती रावसाहेब कांगुणे,बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील,बाजार समितीचे उपसभापती नानभाऊ नवथर,माजी जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब शेळके,राजेंद्र गुगळे,संजय सुखधान,किशोर सुकाळकर,आपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आघाव,माजी नगराध्यक्ष सतीश पिंपळे, डॉ शिवाजीराव शिंदे,अजित मुरकुटे,नारायणराव लोखंडे,निलेश पाटील,अनिल शिंदे, दिनेश व्यवहारे,ऍड आण्णासाहेब आंबाडे, ऍड सादिक शिलेदार,ऍड रोहित जोशी,सोपान पंडित,असिफ पठाण,आशिष कावरे,डॉ राहुल चव्हाण,धनंजय काळे,मुन्ना आतार,इम्रान पटेल,जालिंदर गवळी, हरिभाऊ दरंदले,उदय पालवे यांच्या व नेवासा शहरासह तालुक्यातील शंकरराव गडाख मित्रमंडळाचे कार्यकर्ते तरुण
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवड जाहीर होताच
गुलालाची उधळण करण्यात आली.

——————————————————————-
सत्तेचा दुरुपयोग- संजय सुखधान
नगरपंचायत अधिनियमात स्पष्टपणे बोट वर करून मतदान असा नियम असताना सत्तेचा गैर वापर करण्याचे षडयंत्र रचविले होते. त्याला अधिकाऱ्यांची साथ मिळत होती परंतु अगदी जिल्हाधिकाऱ्या पर्यंत आम्हाला जावे लागले.जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला न्याय दिला. माजी मंत्री गडाख यांनी दिलेला शब्द पाळून सामान्य महिलेला
उपनगराध्यक्ष केले आता सामान्य नेवासकर जनतेसाठी काम केले जाइल असे आप चे नेते संजय सुखधान यांनी सांगितले.
——————————————————————
उपनगराध्यक्ष निवडीत लोकशाहीची पायमल्ली;
अखेर कायदेशीर लढ्यात विजय.
नेवासा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदाची निवड आज पार पडली. दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी नगरसेवकांचे मतदान हात उंचावून घेणे आवश्यक असताना, पिठासीन अधिकारी असलेल्या नगराध्यक्षांनी राजकीय सूडबुद्धीने निवडणूक प्रक्रिया सायंकाळी ४ वाजेपर्यंत जाणीवपूर्वक लांबवली, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
निवडणूक प्रक्रियेत नियमबाह्य हस्तक्षेप होत असल्याने अखेर जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांच्याकडे दाद मागावी लागली. आमची बाजू कायदेशीर असूनही लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करण्यात आला, असे स्पष्ट करण्यात आले.
सर्व अडथळ्यांवर मात करत माजी मंत्री शंकररावजी गडाख यांच्या नेतृत्वाखाली नेवासा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी सौ. शालिनी संजय सुखधान यांची निवड झाली.
एका सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला नेवासा शहराच्या उपनगराध्यक्षपदाची संधी मिळणे हे सामाजिक व राजकीय परिवर्तनाचे प्रतीक असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
उपनगराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना सौ. शालिनी संजय सुखधान म्हणाल्या,
“माजी मंत्री शंकररावजी गडाख यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या या संधीचा उपयोग नेवासा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निष्ठेने करणार आहे.”

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

