नेवासा- तालुक्यातील सुरेगाव (गंगा) गावात अवैध दारू विक्री, गुटखा विक्री आणि जुगार अड्ड्यांचा प्रकार वाढत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. गावात सध्या तीन ठिकाणी अवैध दारू विक्री सुरू असून, यापूर्वी सुरू असलेली दोन ठिकाणची दारू विक्री सध्या बंद असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
या अवैध धंद्यांमुळे गावातील अनेक कुटुंबे व्यसनाधीनतेमुळे उद्ध्वस्त झाली असून तरुण वर्गही या व्यसनांच्या आहारी जात आहे. परिणामी गावातील सामाजिक वातावरण बिघडत असून वादावादी व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

याशिवाय काही ठिकाणी जुगार अड्डेही सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या सर्व प्रकारांकडे नेवासा पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांत आहे. अवैध दारू, गुटखा विक्री व जुगार अड्डे चालवणाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी, अशी ठाम मागणी सुरेगाव (गंगा) येथील ग्रामस्थांनी केली आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

