नेवासा- तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील कारखाना वसाहत रस्त्यावरून दुचाकीवरील 2 भामट्यांनी सायंकाळी 7:30 चे दरम्यान महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून पसार झाले. साडेतीन तोळ्या पैकी सुमारे एक टे दीड तोळे चोरीस गेले आहेत
लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यातील कर्मचारी राजेश वावरे यांच्या पत्नी सुनीता इतर महिलांसोबत नरेंद्र नगर मध्ये हळदी कुंकवासाठी गेल्या होत्या. त्या घरी परतत असताना सायंकाळी 7:30 चे दरम्यान कारखान्या कडून दुचाकीवरून येणाऱ्या मागील भामट्याने सुनिता राजेश वावरे
यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे मंगळसूत्र ओढले. त्यांनी तातडीने लगेच गळ्याला हात लावला परंतु त्या गडबडीत भामट्याने दागिन्याचा अर्धा भाग घेऊन दुचाकी सुसाट वडाळा रस्त्याकडे पळवली. अचानक झालेल्या या घटनेमुळे सुनिता वावरे सह सोबत असणाऱ्या विजया म्हस्के, भाग्यश्री शिंदे घाबरून गेल्या. त्यांनी आरडाओरडा केला मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

