नेवासा – श्री गणेश जयंती निमित्त नेवासा ते नेवासा फाटा रस्त्यावर असलेल्या जागृत पावन गणपती मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात आले असून या सोहळयाचा शुभारंभ शुक्रवारी दि.१६ जानेवारी रोजी धर्म ध्वजारोहण करून करण्यात आला.
श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबा,गुरुवर्य बन्सी महाराज तांबे बाबा यांच्या कृपाशिर्वादाने श्री क्षेत्र पावन गणपती नेवासा येथे श्री गणेश जयंती व मंदिराच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय संत गुरुवर्य महंत श्री भास्करगिरीजी महाराज व महंत स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा साजरा होत असून सप्ताहाचे हे २४ वे वर्ष आहे.
या सोहळयाचा शुभारंभ शुक्रवारी दि.१६ जानेवारी रोजी पारायण व्यासपीठ चालक हभप नारायण महाराज ससे,हभप दत्तात्रय महाराज व्यवहारे, नगराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले यांच्या हस्ते धर्मध्वजारोहनाने करण्यात आला.यावेळी झालेल्या शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी पावन गणपती देवस्थानचे अध्यक्ष अँड.सुखदेव वाखुरे, विश्वस्त अँड.बाळासाहेब शिंदे,नेवासा खुर्द सोसायटीचे चेअरमन मच्छिंद्र पाटील कडू,नेवासा बाजार समितीचे माजी सभापती शंकरराव लोखंडे,नगरसेवक महेश लोखंडे मंदिर सेवेकरी दत्तात्रय गायकवाड यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते
गणेश जयंती निमित्ताने होणाऱ्या किर्तन सोहळयात युवा किर्तनकार शशिकांत महाराज कोरेकर, गणेश महाराज तनपुरे,अंकुश महाराज जगताप,लक्ष्मण महाराज नांगरे, ज्ञानेश्वर महाराज हजारे,रामेश्वर महाराज कंठाळे सर यांची किर्तने होणार असून शुक्रवार २३ जानेवारी रोजी संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त ह.भ.प. गुरुवर्य वेदांतचार्य देविदासजी महाराज म्हस्के शास्त्री यांच्या सकाळी १० ते १२ यावेळेत होणाऱ्या काल्याच्या किर्तनाने या उत्सवाची सांगता होणार आहे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

