
नेवासा – कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा पिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात फार्म खर्च करावा लागतो. बी-बियाणे, खते, औषधे, पाणी, मजुरी आणि साठवणूक यावर हजारो रुपये खर्च होतात. मात्र बाजारपेठेत कांद्याची आवक-जावक कमी-जास्त झाली की दर कोसळतात आणि त्याचा थेट फटका शेतकऱ्यांच्या डोक्यावर बसतो.

योग्य दराच्या अपेक्षेने कांदा साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांचा कांदा खराब होत असून शेवटी अत्यल्प दरात विक्री करण्याची वेळ येत आहे. सध्या कांद्याला उत्पादन खर्चाच्या तुलनेत अतिशय कमी भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
या परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना शेतकरी नेते त्रिंबकराव भदगले यांनी सांगितले की, सरकारने भावनेवर आधारित निर्णय न घेता शेतकऱ्याच्या पेरणी धोरणावर आधारित ठोस कृषी धोरण राबवणे गरजेचे आहे. कांद्याच्या बाबतीत दर कोसळले असताना केवळ आश्वासनांवर वेळ न घालवता भावांतर योजना (फरक बिल) तातडीने लागू करावी, अशी त्यांनी मागणी केली.
शासनाने निश्चित केलेला रास्त दर आणि प्रत्यक्ष बाजारभाव यातील फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली. तसेच कांद्याची निर्यात फक्त बांगलादेशापुरती मर्यादित न ठेवता इतर देशांशीही स्थिर व दीर्घकालीन निर्यात धोरण अवलंबल्यासच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.वेळीच योग्य निर्णय न घेतल्यास कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा असंतोष वाढून आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

