नेवासा- राज्यातील कृषि विद्यापीठांतर्गत शिक्षकवर्गीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वयावरुन ६० वर्षे करणे संदर्भात घेण्यात आलेला निर्णय कायम करण्यात आला आहे. याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या नवीन निर्णयामुळे सर्व कृषी विद्यापीठांमधील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, विभाग प्रमुख, शारीरिक शिक्षण संचालक यांसारख्या शिक्षकवर्गाच्या सेवानिवृत्तीचे वय पुन्हा ६० वर्षे झाले आहे. या निर्णयामुळे सध्या सेवेत असलेल्या काही ज्येष्ठ शिक्षकांमध्ये नाराजी असली, तरी प्रशासकीय सुसूत्रतेसाठी सरकारने हा बदल कायम ठेवला आहे. सेवानिवृत्तीचे वय कमी केल्यामुळे रिक्त होणाऱ्या पदांवर नवीन आणि तरुण उमेदवारांची भरती प्रक्रिया राबवणे सरकारला सोपे होणार आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

