नेवासा- कृषी पदवीधर उद्योजक होण्यासाठी शैक्षणिक धोरणात कौशल्यपूर्ण अमुलाग्र बदल करावेत अशी विनंती वजा सूचना श्रमिक शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष साहेबराव नवले पाटील यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉक्टर विलासराव खर्चे यांच्याकडे केली. कृषी पदवीधर हे आजच्या प्राप्त स्थितीत देशाचा कणा आहेत त्यांना प्रात्यक्षिक अनुभव अधिकाधिक देऊन कौशल्यपूर्ण शिक्षण दिल्यास ते उद्योजक होतील व त्यामुळे त्यांचे भवितव्य उज्वल राहील असा ठाम विश्वास श्री नवले यांनी व्यक्त केला. कुलगुरू डॉक्टर खर्चे यांनी प्रथम विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रातील अभ्यासक्रमातील शास्त्रीय ज्ञानाला प्राधान्य दिले जाते त्या विषयाची सखोल माहिती होण्यासाठी कृषी पदवीधरांना लेखी व प्रात्यक्षिक ज्ञान दिले जाते यापुढील काळात कृषी पदवीधर यांची कौशल्य विकसित करण्याचे प्रयत्न आहेत कारण त्यांना भरपूर संधी उपलब्ध होत आहेत. माजी कुलगुरू डॉ अशोकराव ढगे यांनी कृषी कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान अवगत करून संशोधनावर आधारित कौशल्य अंगीकारल्यास भविष्यकाळात मोठी आव्हाने कृषी पदवीधर स्वीकारतील असा विश्वास व्यक्त केला याप्रसंगी अध्यक्ष साहेबराव नवले यांनी कुलगुरूंचा सन्मान करून त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या प्रा डॉ समीर ढगे यांनी ऋणनिर्देश व्यक्त केले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

