तहसील

मतदानाचे मूल्य समजून घेणे काळाची गरज

नेवासे (प्रतिनिधी) – “आजचे विद्यार्थी हे उद्याचे राष्ट्रनिर्माते आहेत,त्यामुळे त्यांनी आतापासूनच मतदानाचे मूल्य समजून घेणे काळाची गरज आहे. भारतीय लोकशाहीची खरी ताकद मतदारांमध्ये आहे. जेव्हा प्रत्येक नागरिक आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावेल, तेव्हाच लोकशाही अधिक सक्षम, पारदर्शक आणि उत्तरदायी बनेल असे प्रतिपादन अहिल्यानगर-नेवासेचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी केले.

तहसील

भारतीय लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आणि नवमतदारांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आज रविवार दि. २५ रोजी नेवासे तहसील कार्यालयाच्या वतीने ‘राष्ट्रीय मतदार दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी उपस्थित नवमतदार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उपविभागीय पाटील बोलत होते. यावेळी तहसीलदार डॉ. संजय बिरादार, निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार प्रशांत गोसावी, उपशिक्षण अधिकारी समी शेख, महाविद्यालयीन प्रतिनिधी प्रा. सुनील गर्जे, बदामबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक विश्वनाथ नानेकर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांनी राष्ट्रीय मतदार दिनाचे ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट करत गेल्या काही वर्षात मतदानाची कमी होणारी टक्केवारी ही लोकशाहीसाठी घातक व शोकांतिका असून मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करणे तसेच मतदारांनी लोकशाहीचा हा उत्सव प्रत्यक्षात मतदान केंद्रावर साजरा करावा असे आवाहन केले.
नायब तहसीलदार प्रशांत गोसावी यांनी यावेळी उपस्थितांचे स्वागत करत कार्यक्रमाचे महत्व व उद्दिष्टे मांडत गेल्या काही निवडणुकीत शहरी व ग्रामीण भागांमध्ये घसरत चाललेल्या मतदानाच्या टक्केवारीबाबत चिंता व्यक्त करून पूर्वीच्या काळापासून मतदान पद्धतीमध्ये झालेल्या बदलाची माहिती दिली.

तहसील

यावेळी निवडणूक विभागाचे असिफ शेख, विकास दारूटे, चंद्रकांत कहार, शिवशंकर श्रीनाथ तसेच प्रा. मुकुंद खर्डे, युसूफ शेख, अशोक डौले, प्रकाश पटेकर, श्रीहरी तांबडे, प्रशांत खंडाळे, निहाल, अजय आव्हाड या विविध शाळांच्या शिक्षकांबरोबर विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी व नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षण अधिकारी समी शेख यांनी केले.

नवमतदारांना निवडणूक ओळखपत्रांचे वाटप

यावेळी नवमतदारांना उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, डॉ. बिरादार यांच्या हस्ते निवडणूक ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. उपस्थितांनी “मी नक्की मतदान करीन” अशी सामूहिक शपथ घेऊन लोकशाहीप्रती आपली निष्ठा व्यक्त केली. यावेळी माझा मतदानाचा हक्क- माझी लोकशाहीची ताकद, “एक मत-अनेक बदल, जागा व्हा, सजग व्हा, मतदान करा, अशा घोषणांनी तहसील कार्यालयासह परिसर दुमदुमून गेला होता.

तहसील

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

तहसील
तहसील

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

तहसील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!