
नेवासा- शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य संस्थेची महत्त्वपूर्ण बैठक संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी दुपारी कोहिनूर मंगल कार्यालय अहमदनगर येथे वैचारिक चर्चा करून संपन्न झाली या प्रसंगी गरजे यांनी प्रास्ताविक करून सर्वांचे स्वागत केले संस्थेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी मागील दोन सभेचे इतिवृत्त वाचले व ते कायम करण्यात आले तसेच पुरोगामी विचार व विज्ञाननिष्ठा या संदर्भात विविध शाखा स्थापन करण्याबाबत सांगोपांग चर्चा झाली स्वर्गीय अरुण आहेर यांच्या जागेवर राज्य कार्यकारिणीवर शोभे यांची एक मताने निवड झाली तसेच संपत दादा बारस्कर नवनिर्वाचित नगरसेवक यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला साहित्य संमेलन घेण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली स्वागताध्यक्ष अध्यक्ष उद्घाटक यासंदर्भात चर्चा झाली.

साहित्य संमेलन एप्रिल महिन्यात घेण्याचे ठरविण्यात आले याप्रसंगी माजी कुलगुरू डॉक्टर अशोकराव ढगे यांनी शब्दगंध साहित्यिक परिषद शाखा नेवासा अंतर्गत फिरते मोफत वाचनालय यासंदर्भात सविस्तर वाचन चळवळीची माहिती दिली शाखा अध्यक्ष प्रा डॉ किशोर धनवटे यांनी उपक्रम 22 गावात नेवासा तालुक्यात घेतल्याचे सांगितले सुनील गोसावी यांनी सदर उपक्रम स्तुत्य असल्याचा दुजोरा दिला. अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी बहुमोल सूचना केल्या याप्रसंगी गाडेकर अशोक कानडे, प्राचार्य ढोकणे दिगंबर गोंधळी, कार्यकारिणीचे सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रा शर्मिला गोसावी यांनी सर्वांचे ऋणनिर्देश व्यक्त केले

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

