नेवासा- विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम टोका येथे ५१ फूट उंच धर्मध्वज स्थापना तसेच छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या लोकार्पणाचा सोहळा शुक्रवार दि. ३० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे.धर्मध्वज पूजन महंत भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रकाशानंदगिरी महाराज, महंत सुनीलगिरी महाराज तसेच जानार्दन महाराज मेटे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय विश्वस्त प्रभाकर शिंदे, संजय बारगजे, आमदार विठ्ठलराव लंघे, अॅड. सुनील चावरे यांच्यासह विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे विविध पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

