शिरेगाव (प्रतिनिधी) | अविनाश जाधव – नेवासा तालुक्यातील शिरेगाव येथे वै.ह.भ.प. गुरुवर्यं योगीराज तुकाराम बाबा खेडलेझुंगे, वै.ह.भ.प. बन्सी महाराज तांबे श्री क्षेत्र नेवासा, वै.ह.भ.प. पारायणाचार्य भानुदास महाराज गायके यांच्या कृपाशीर्वादाने स्वानंद सुख निवासी वै. जोग महाराज, वै ह.भ.प. गोविंदबाबा संतद्वयांचे पुण्यतिथी निमित्ताने ह.भ.प. प्रभाकर महाराज कावले, ह.भ.प. सुधाकर महाराज आहेर, यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दि ३१ जानेवारी २०२६ ते शनिवार दि ०७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत ह.भ.प. वैराग्यमूर्ती गोविंद बाबा यांचे पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह तथा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठया थाटामाटात संपन्न होणार आहे.
या सोहळ्यात दैनंदिन कार्यक्रम पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ६ ते ७ आरती, सकाळी ७ ते ११ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी ३ ते ५ भजन, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, रात्री ७ ते ९ हरी किर्तन त्या नंतर महाप्रसाद सेवा संपन्न होणार आहे. या सोहळ्यात शनिवार ३१ जानेवारी रोजी वारकरी भूषण उमेशजी महाराज दशरथे (आळंदी देवाची), रविवार १ फेब्रुवारी रोजी रामायणाचार्य प्रभाकर महाराज कावले, सोमवार ०२ फेब्रुवारी वेदांताचार्य भगवान महाराज जंगले शास्त्री,
तसेच या सोहळ्याला महंत गुरुवर्य राष्ट्रसंत भास्करगिरीजी महाराज देवगड संस्थान यांची स. १० वा सदिच्छा भेट होणार असून पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांने उपस्थित राहावे. मंगळवार ०३ फेब्रुवारी
वेदांताचार्य गुरुवर्य जंगले महाराज शास्त्री श्री ज्ञानेश योगाश्रम डोंगरगण, बुधवार ०४ फेब्रुवारी वेदांताचार्य केशव महाराज शास्त्री खेडले झुंगे, गुरुवार ०५ फेब्रुवारी अध्यक्ष योगीराज तुकाराम बाबा संस्थान निष्काम कर्मयोगी रघुनाथ महाराज खटाणे,
शुक्रवार ०६ फेब्रुवारी वेदांताचार्य देवीदासजी महाराज म्हस्के श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, श्री क्षेत्र नेवासा, तसेच शनिवार दि ०७ फेब्रुवारी रोजी स. १० ते १२ या वेळेत महंत स्वामी श्री प्रकाशानंदगिरीजी महाराज (उत्तराधिकारी, श्री क्षेत्र देवगड संस्थान) यांचे काल्याचे किर्तनाने या सोहळ्याची सांगता होणार, तद्नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
व्यासपीठ चालक प्रभाकर महाराज कावले, सुधाकर महाराज आहेर, मृदंगाचार्य सुधाकर महाराज आहेर, गोपाल महाराज कावले सहकार्य भगवान महाराज जाधव (सरत्ना बेट) भजनीमंडळ खेडले परमानंद, वळणपिंप्री, गोणेगाव, निभारी, अंमळनेर, करजगाव, पानेगाव, पाथरे, खुडसरगाव, कोपरे, मालुंजे, वांजुळपोई, वाटापूर, तिळापूर, शेणवडगाव, लांडेवाडी, मांजरी आदी गावातील ग्रामस्थ व भजनी मंडळ या सोहळ्यात सहभागी होणार आहे. कार्यक्रमाचे ठिकाण शिरेगाव हनुमान मंदिर प्रांगण, ता नेवासा, जि अहिल्यानगर
वै प पु गुरुवर्य योगिराज तुकाराम बाबा व गोविंद बाबा भक्त मंडळ, समस्त ग्रामस्थ, शिरेगाव

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

