नेवासाफाटा (वार्ताहर): राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनाने संपूर्ण नगर जिल्हा शोकसागरात बुडालेला असून आपल्या लाडक्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शुक्रवार (दि.३०) रोजी नेवासाफाटा येथील व्यापारी संघटनेने स्वयंस्आफूर्तीने आपापली दुकाने कडकडीत बंद ठेऊन स्व.पवार यांना राजमुद्रा चौकात श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी झालेल्या श्रद्धांजली सभेत सरपंच सतिषदादा निपुंगे, पोलीस पाटील आदेश साठे, सामाजिक कार्यकर्ते संजय गायकवाड, ॲड.अशोक करडक, राजेंद्र वाघमारे, गणेश झगरे, रावसाहेब घुमरे, बापू निमसे यांनी स्व.पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनामुळे शुक्रवारी नेवासाफाटा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. सकाळपासूनच परिसरातील सर्व दुकाने, हॉटेल्स बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे नेहमी गर्दीने गजबजणाऱ्या राजमुद्रा चौकात दिवसभर शुकशुकाट जाणवत होता. याप्रसंगी श्रद्धांजली सभेप्रसंगी संतोष मोरे, माऊली देवकाते, कैलास निपूंगे, पप्पू मगर, कानिफनाथ उपळकर, राजेंद्र बोलके, आकाश सरोदे, अमित मेहेर, किरण निपूंगे, किशोर इंगळे, राजेंद्र साळवे, रवी पवार यांसह व्यापरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

