खरवंडी | वार्ताहर विठ्ठल उदावंत – नेवसा -तालुक्यातील खरवंडी ग्रामपंचायत मध्ये. प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला गावचे सरपंच श्री गोरक्षनाथ शिदे याचे हस्ते ध्वोजारोहण करण्यात आले व त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खरवंडी नंबर 1 मध्ये प्रजासत्ताक दिन… प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खरवंडी नंबर 1 येथे सरपंच श्री गोरख शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी संगीतमय लेझीम नृत्य; कवायत ; विविध देशभक्तीपर समूहगीत सादर केले. मुख्याध्यापक श्री शरद खंडागळे यांनी प्रास्ताविक पर भाषणात शाळेच्या रंग कामासाठी सहकार्य केलेल्या कल्याण येथील उद्योजक शाळेचे माजी विद्यार्थी श्री संभाजीराव भोगे पाटील व ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले .शाळेच्या भौतिक प्रगतीसाठी व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शाळेत यापुढे राबवायच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच याप्रसंगी शाळेतील शिक्षिका श्रीमती सपना गायकवाड /गवळी मॅडम यांनी त्यांच्या सासूबाई कै. प्रयागबाई गवळी ( घोडेगाव) यांच्या स्मरणार्थ शाळेला ५०००/ हजार रुपये किमतीचे क्रीडा साहित्य भेट दिले. विद्यार्थ्यांनी बीट पातळी व केंद्र पातळीवर मिळवलेल्या विविध बौद्धिक सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांमधील उल्लेखनीय क्रमांकाबद्दल श्री प्रणव चोरडिया यांनी विद्यार्थ्यांना बक्षीस दिले. याप्रसंगी उपसरपंच संतोष राजळे; पोलीस पाटील संदिप फाटके ग्रामविकास आधिकारी शिवाजी निकम गणेश फाटके आण्णासाहेब बेल्हेकर संतोष बुचकुल पोपट मिसाळ आसिफ शेख मयूर थोरात नागेश कुऱ्हे ; निवृत्त आरोग्य अधिकारी अनिल कुऱ्हे ,मच्छिंद्र भोगे महाराज, पोपट मिसाळ ,शेखर मस्के सोपान कुऱ्हे गुरुजी, बाळासाहेब कुऱ्हे ,बाळासाहेब फाटके प्रा नाथाभाऊ पंडित सर,संतोष भोगे अंगणवाडी सेविका आरोग्य आधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होतामान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री संदीप बोठे सर यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती उषाताई मोरे -खंडागळे केले. विद्यार्थी खाऊवाटपणे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

