देवगड फाटा (वार्ताहर)नेवासा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्व प्राप्त असलेल्या जळके बुद्रुक येथील वि वि का सोसायटी च्या अध्यक्ष पदी शंकरराव गडाख गटाचे शशिकला रामदास झगरे तर उपअध्यक्षपदी हरिभाऊ बापू थोरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली
दि ११ सप्टेंबर रोजी जळके बुद्रुक विविध वि कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध निवड सप्पन झाली
अध्यक्ष पदाची सूचना सलीम शेख यांनी मांडली, तर त्यास शिवाजी नवशे यांनी अनुमोदन दिले. उपअध्यक्षपदाची सूचना श्रीमल गांधी यांनी मांडली, तर त्यास सुनील लोखंडे यांनी अनुमोदन दिले.
या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी जे एस पवार .यांनी काम पाहिले तर मदतनीस म्हणून श्रीकांत लघे होते.
या प्रसंगी सुनील लोखंडे,सुनील शिंदे,सलीम शेख, विठ्ठल पाठे,राजू पागिरे, रावसाहेब मोटे, बाळासाहेब खराडे, अशोक राजगुरू, शिवाजी नवशे, श्रीमल गांधी, सुनीता गोरे व इतर मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते
निवडीनंतर माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

