देवगड फाटा : नेवासा तालुक्यातील देवगड फाटा येथील एका चहाच्या हॉटेलमध्ये चाय पे चर्चा करत माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी शेतकरी, युवक,व कार्यकर्त्यांशी सविस्तर संवाद साधला. साध्या व अनौपचारिक वातावरणात पार पडलेल्या या बैठकीत ग्रामीण भागातील विविध प्रश्नांवर थेट चर्चा करण्यात आली.

या वेळी जळके बुद्रुक, खडका, जळके खुर्द, बकुपीपळगाव, मडकी, प्रवरासंगम ,देवगड फाटा परिसर,तसेच परिसरातील अन्य गावांमधील शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध गावांतील नागरिकांनी आपापल्या भागातील समस्या मांडत प्रलंबित मागण्या मांडल्या बैठकीत अनियमित वीजपुरवठा, पाणीटंचाई, वाढता शेती खर्च, बाजारभावातील अस्थिरता, पीकविमा योजनेतील त्रुटी, रस्त्यांची दुरवस्था तसेच शासकीय योजनांचा अपुरा लाभ अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. तर अनेक युवकांनी भेट घेतली.अनेकांनी लग्न निमंत्रण तसेच विविध कार्यक्रमांचे माजी आमदार शंकरराव गडाख यांना निमंत्रित केले.
या प्रसंगी माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा सत्कार परिसराच्या वतीने इकबाल शेख यांनी केला या प्रसंगी मार्केट कमिटी संचालक गणेश भोरे,निवृत्ती थोपटे, थोपटे, महसूल विभागाचे सुनील खंडाले, सरपंच कैलास झगरे, वि वि का सो चेरमन गिनदेव झगरे, बाळासाहेब थोरात,भांगे,अशोक पुंड, संजय लोखंडे,हबीब शेख, नितीन दहातोंडे,रावसाहेब मोटे,सत्तार शेख, भाऊराव बर्डे, अशोक रुपनर,बाळासाहेब खराडे,शुभम नाईक,शरद पागिरे, राजू परदेशी, लक्षमन साठे, शंकरराव गडाख यांनी उपस्थितांचे प्रश्न लक्षपूर्वक ऐकून घेत संबंधित विभागांकडे तातडीने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
ग्रामीण भागाचा विकास हा सर्वांच्या सहभागातूनच शक्य आहे. शेती सक्षम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, सूक्ष्म सिंचन आणि पूरक उद्योगांना चालना देणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले. तसेच प्रलंबित विकासकामांबाबत अधिकाऱ्यांशी लवकरच बैठक घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

कार्यकर्त्यांना संघटन बळकट करण्याचे आवाहन करत गावागावांत संवाद वाढविण्यावर त्यांनी भर दिला. कार्यक्रमाच्या शेवटी विविध मागण्यांचे निवेदन त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. परिसरातील विविध गावांतील शेतकरी-कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाला व्यापक प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.या प्रसंगी मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.








