नेवासा : तालुक्यातील नेवासा शहरातील नगर पंचायत चौक येथे सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सर्व पक्षीय शोकसभा आज शनिवारी रोजी सकाळी दहा वाजता नगर पंचायत चौक येथे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शोकसभेचे चे आयोजन राष्ट्रवादी चे तालुका अध्यक्ष अशोक मोरे आणि नेवासा राष्ट्रवादी विधानसभा नेते अब्दुल भैय्या शेख यांनी केले होते. श्रद्धांजली अर्पण करताना शिवसेना वतीने नेवासा तालुक्यातील आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी सांगितले राजकारणातील दादा माणूस वेळेवर सभेला येणारा नेता मला जिल्हा परिषद अध्यक्ष करणारा सर्व पक्षात शिस्तप्रिय आणि वक्तशीरपणा, निर्भीड, असणारा शब्दाला जगणारा नेता म्हणजे अजितदादा पवार होते. अब्दुल भैय्या शेख म्हणाले माझा आधारवड माझ्याच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबातील सदस्य यांना आपल्या कुटुंबातील दादा यांना श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ आली मोठी शोकांतिका आहे. माझ्यासारखे विविध जाती धर्मातील गोर गरीब यांना आपुलकीने विचारपूस करुन पोटाशी लावणारा नेता हरपला हा माझ्या जीवनातील खुप मोठी हानी आहे. दादा परत या… दादा परत या… अजितदादा अमर रहे अश्या घोषणानी परिसर दुमदुमून गेला होता. या वेळी श्रद्धांजली अर्पण करताना माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, धाडस सामाजिक संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख गणेश चौगुले,आम आदमी पार्टीचे संजय सुखधान, क्रांतिकारी चे बाजार समितीचे चेअरमन नंदू पाटील, भाजपा चे शहराध्यक्ष मनोज पारखे, काँग्रेस चे अंजुम पटेल, राष्ट्रवादी चे बालेंद्र पोतदार, युवक चे अभिराज अरगडे, भाजप चे नगरसेवक महेश लोखंडे, नगरसेवक प्रवीण सरोदे, शिवसेना नगर सेवक अंकुश म्हस्के, बाळासाहेब पवार, इम्रान दारुवाला, बाळासाहेब कोलते, आदिनाथ पटारे, शैलेश पाटील आदी मोठ्या संख्येने सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते, नागरिक उपस्तितीत होते.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

