बेलपिंपळगाव येथील दत्तात्रय धिरडे यांनी तीन हजार सहाशे किलोमीटर नर्मदा परिक्रमा पार केली
नेवासा :- नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथील वारकरी दत्तात्रय धिरडे आणि मित्रपरिवार यांनी चार महिन्यात खडतर प्रवास करीत नर्मदा माता परिक्रमा केली. भल्या पाहटे उठायचं ऊन, वारा, पाऊस, वादळ, चिखलाचे रस्ते, वादळ, आदी अनुकूल परिस्थिती मध्ये प्रवास केला. रोज तीस चाळीस किलोमीटर पायी प्रवास करायचा. मठ, मंदिर आदी विसाव्याच्या ठिकाणी मुक्काम करायचा. रोज गरजेपुरते अन्न प्रसाद म्हणुन सेवन करायचा. जगण्यापुरते अन्न, फळ सेवन करायचे. पहाटे उठून नर्मदा मातेच्या थंड पाण्याने स्नान करायचे. नर्मदा पुजन करुन हर हर नर्मदे म्हणत रस्ता पदक्रांत करायचा. वाटेनं मिळणाऱ्या लोकांशी संवाद साधायचा. विभिन्न प्रदेश, वेगवेगळ्या भाषा, अन्न, पेहराव, संस्कृती, विविधतेत एकता तेथे आढळून येथे. तिथला परिसर हर हर महादेव, हर हर गंगे, हर हर नर्मदे नामःघोषणे ने दुमधुमून जातो. नर्मदा परिक्रमा केली की जीवन सार्थकी लागते. गंगेत घोडे नाहले असे भाविक भक्तांना प्रचिती येथे. सुख येवो, दुःख येवो, प्रत्येक परिस्थिती मध्ये सम राहणे म्हणजे स्तिथप्रज्ञ् होय. या वेळी आमदार विठ्ठलराव लंघे समर्थक युवा नेते कुणाल बोरुडे, धर्मरक्षक गणेश चौगुले, प्राध्यापक किशोर गटकळ, गौरव गटकळ, बाबासाहेब रोटे, खंडेराव सरोदे, कैलास शिंदे,चंद्रकांत सरोदे, महेश शेरकर, तुषार भांड साहेब, निखिल डिके पाटील आदी मोठ्या संख्येने उपस्तितीत होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

