प्रमाणपत्र

नेवासा-प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जन्म मृत्यू प्रमाणपत्र हे शहरातील नागरिकांना घरपोच पोच करण्याचा उपक्रम नगराध्यक्ष डॉक्टर करण सिंह घुले यांच्या उपस्थितीत घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले.

निवडणूक काळात महायुती कडून घोषणा करण्यात आली होती त्या प्रमाणे आज शनिवारी शहरात हि मोहीम राबविण्यात आली.जन्म आणि मृत्यूच्या प्रमाणपत्रासाठी नागरिकांना हेलपाटे घालावे लागतात. जे नागरिक प्रमाणपत्र घेण्याचे विसरुन जातात अथवा नोंद लावण्याचे विसरतात त्यांच्यासाठी देखील हा उपक्रम गरजेचा आहे. यातून नागरिकांची ससेहोलपट नक्कीच थांबणार आहे असे मत गटनेते महेश लोखंडे यांनी या वेळेला व्यक्त केले.

Kavya

नगरपंचायत यांच्या माध्यमातुन काम करत असताना नागरिकांची सुविधा करणे हे सर्वोच्च प्राधान्य क्रमाचे काम आहे, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या निर्देशानुसार काम करताना प्रशासकीय सुसूत्रता ठेवत महायुतीच्या सर्व नगरसेवकांनी आज नगरपंचायत मध्ये जन्ममृत्यू विभागात खतवलेला पहिला मृत्यू दाखला हा घरपोच देण्याचा उपक्रम पार पाडला.

स्व .ग. भा.वत्सलाबाई एकनाथ चव्हाण यांच्या मृत्यूचा दाखला त्यांच्या सुनबाई संगीता चव्हाण यांच्याकडे घरी जाऊन सुपूर्त करण्यात आला. यावेळी गटनेते महेश लोखंडे, नगरसेवक प्रवीण आप्पा सरोदे, निरंजन डहाळे, अंकुश म्हस्के, अनिल पवार, संदीप सरकाळे, सचिन भांड, धनंजय कंनगरे यांच्यासह नगराध्यक्ष डॉ करणसिंह घुले पाटील उपस्थित होते.

कोट-
प्रजासत्ताक दिनी जाहीर केलेला उपक्रम नागरिकांच्या सोयीसाठी नागरिकांच्या दारी घेऊन गेल्याबद्दल नागरिकांकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

प्रमाणपत्र
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

प्रमाणपत्र
प्रमाणपत्र

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

प्रमाणपत्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!