देवगड फाटा (वार्ताहर) –अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्या संचलनाखाली श्री कृष्णा संगीत विद्यालय, नेवासा फाटा येथे घेण्यात आलेल्या संगीत विशारद (गायन) पदवी परीक्षेत प्रवरासंगम येथील कु. विद्या अरुण कोरडे हिने प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
शेतकरी कुटुंबातील मुलगी असूनही विद्याने आपल्या जिद्द, सातत्यपूर्ण परिश्रम आणि संगीतावरील निष्ठेच्या बळावर हे यश मिळवले आहे. शेतकऱ्यांची मुले केवळ शेतीपुरती मर्यादित नसून कला व संस्कृतीच्या क्षेत्रातही आपले वेगळे स्थान निर्माण करू शकतात, हे तिने आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे.

विद्याच्या या यशामागे तिचे संगीत गुरु श्री. कृष्णा कुलकर्णी सर यांचे मोलाचे मार्गदर्शन तसेच कोमलताई कुलकर्णी यांचे प्रेरणादायी सहकार्य लाभले. .
‘संगीत विशारद’ ही पदवी प्राप्त करून विद्याने संगीत क्षेत्रात आपली ठळक ओळख निर्माण केली असून तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. एका शेतकरी कुटुंबातील मुलीने संगीतासारख्या कलात्मक क्षेत्रात मिळवलेले हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

