नेवासा-संत रोहिदास महाराज जयंती चे औचित्य साधून “नगरपंचायत आरोग्य साधना” हा उपक्रम शहरातील नागरिकांसाठी सुरू करण्यात आला. या उपक्रमाची माहिती देताना नगराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले म्हणाले की, असंसर्गजन्य आजाराचे रुग्ण हे आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे हे आजार बळावतात हा आमचा गेल्या वीस वर्षाचा रुग्णसेवीतील अनुभव आहे. आर्थिक विवंचना, ज्येष्ठ नागरिक असणं, आणि आरोग्याबाबत दुर्लक्ष अशी यामागची कारणे आहेत. याचबरोबर प्रतिबंधात्मक उपाय करणे देखील शक्य होणार आहे.दरमहा असणाऱ्या या उपक्रमामुळे रुग्णांची मोठी सोय होणार आहे.

नगरसेवक प्रवीण सरोदे यांनी योजनेचे महत्त्व विशद करून संत रोहिदास महाराज जयंती निमित्ताने कार्यक्रम होत असल्याने समाधान व्यक्त केले. संतांचे उपदेश प्रत्यक्ष कृतीतून सादर करून लोकोपयोगी उपक्रम राबविण्याची रीत राज्यस्तरावर वाखाणली जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
वैद्यकीय अधिकारी डॉ सिद्दिकी शेख यांनी योजनेतील बारकावे समजून सांगितले व नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी संत रोहिदास महाराजांचे विचार कृतीतून उतरवण्याच्या या उपक्रमाचे समाजसेवक रवींद्र शेंडे यांनी कौतुक केले. संत रोहिदास महाराज जयंती अशा पद्धतीने साजरी होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नागरिक भानुदास तोगे मामा, वैशाली ड्रेसेसचे कडू पाटील, शिवाजीराव चव्हाण सर, अशोकराव डहाळे, डॉक्टर सिद्दीक शेख, हिरामण शेठ धोत्रे, प्रवीण आप्पा सरोदे, रवींद्र शेंडे, भाऊसाहेब मामा वाघ बंडू शिंदे, पप्पू परदेशी कृष्णा परदेशी संदीप सरकाळे नगरसेवक अनिल पवार नगरसेवक अंकुश म्हस्के राजू शेठ शेंडे, नाना संकपाळ, नाना शेंडे, जालिंदर शेंडे, निलेश शेंडे, नितीन मीरपगार, माधव नन्नवरे, प्रभाकर आहेर, अभिजीत मापारी, यांच्यासह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

