नेवासा- केंद्रीय अर्थसंकल्प 2026 विश्लेषण:: डॉ. अशोक ढगे. भारतीय अर्थसंकल्प 2026 रोजी भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी 2026 रोजी सादर केला. यामध्ये प्रामुख्याने आर्थिक विकास, लोकांचे जीवनमान सुधारणे व गरिबांचे कल्याण हा उद्देश ठेवून भारत जगात तिसरा नंबरची आर्थिक सत्ता व्हावी यासाठी सादरीकरण करण्यात आले कृषी क्षेत्राच्या बाबतीत पशुपालक शेतकऱ्यांना भरीव तरतूद करून महाविद्यालय तसेच दवाखाने व जनावरांच्या रोगांचे निदान इत्यादीसाठी जाणीवपूर्वक लक्ष देण्यात आले शेतीच्या क्षेत्रात नारळ संवर्धन, सिंचनासाठी निधी, काजू योजना प्रास्ताविक केली आहे

एकूण शेतीसाठी एक लाख कोटी निधी तरतूद केली आहे मत्स्य पालन यासाठी खास संधी निर्माण करण्यात येत आहे तसेच लहान शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी विशेष लक्ष देण्यात येत आहे एकंदरीत शेतीमालाच्या भावाच्या संदर्भात व शेतकऱ्यांना फारसा दिलासा प्रथम दर्शनी आढळून येत नाही कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन यासाठी सौर ऊर्जा ला प्राधान्य दिले आहे एकंदरीत अर्थसंकल्प समाधानकारक असला तरी शेतकऱ्यांसाठी सविस्तर माहिती उपलब्ध झाल्यानंतरच दिलासा मिळेल – कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे नेवासा


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

