नेवासा- तालुक्यातील देवगड फाटा व जळके बुद्रुक परिसरात ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. देवगड फाटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (झगरे वस्ती), जळके बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच जळके बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालय येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
देवगड फाटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (झगरे वस्ती) येथे ध्वजारोहण पत्रकार इकबाल हुसेन शेख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच कैलास झगरे, उपसरपंच संजय बर्डे, ग्रामविकास अधिकारी नानासाहेब झुंबड, पोलीस पाटील अशोक पुंड, नितीन दहातोंडे, अशोक रूपनर, चांगदेव थोरात, व्यास पिठावर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी कवायत, साहित्य कवायत, देशभक्तीपर गीतांवर आकर्षक नृत्य सादर केले. तसेच मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत विविध सामाजिक विषयांवर प्रभावी मनोगते व्यक्त केली. या सादरीकरणांना उपस्थितांकडून जोरदार टाळ्यांची दाद मिळाली. शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या प्रसंगी रमेश बाचकर, रवी रूपनर, कृषी अधिकारी श्री. राठोड, विशाल पंडित, मुख्याध्यापक दशरथ ढोले, छगन थोरात, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब थोरात, एकनाथ मिसाळ, सुजित थोरात, अजिनाथ थोरात, नवनाथ जठडे, सचिन कोकरे, रविंद्र रूपनर, अरुण देहडे, सुनील माळी, एकनाथ माळी, संचित थोरात, सचिन सुसे, कार्तिक रूपनर, ज्योती पंडित, ज्योती राठोड, रेखा थोरात, सुषमा गोरावडे, मनीषा खराडे, सुमनबाई थोरात, राणी भूमकर, सविता रूपनर, राधा माळी, सोनाली पंडित, शिक्षिका वृषाली गागरे, शिक्षकवृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक दशरथ ढोले यांनी आभार मानले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

