नेवासा-ग्रामदैवत मोहिनीराज भगवान यात्रा महोत्सव प्रसंगी मंदिराच्या प्रांगणात रुढी परंपरागत आलेल्या सात दिवसीय भागवत कथा यावर्षी भागवताचार्य प पू साध्वी अनुराधा दीदी पंढरपूरकर यांच्या मधुर वाणीतून गेले सात दिवस चालू असलेल्या भागवत कथेचे आज समाप्ती झाली गेले सात दिवस मोहिनीराज मंदिर प्रांगणात त अतिशय उत्साहाने विशेष करून महिलांचा सहभाग लक्षणीय व भूतपूर्व असा होता संपूर्ण वातावरण आध्यात्मिक दृष्टीने सुंदर बनलेलं होतं साती ही दिवस लहान तरुण आणि ज्येष्ठ सर्वच महिलांनी तसेच पुरुषांनी देखील या मंत्रमुग्ध अशा भागवत कथेचे अमृत ग्रहण केले

आज भागवत कथेच्या आरती नंतर भागवत कथेची मंदिर प्रदक्षिणा साठी महिलांचा प्रतिसाद आणि गर्दी लक्षणीही भागवत कथा अनेकांनी डोक्यावर घेऊन महिलांनी फुगडी चा आनंद घेत भागवत कथेला एका उत्सवाप्रमाणे आनंद घेतला मंदिरापासून निघालेल्या भागवत कथा मिरवणुकीमध्ये अनेकांनी आपापल्या अंगणात भागवत कथेचे पूजन व औक्षण केले भागवत कथेच्या ह्या मिरवणुकीसाठी महिलांचा प्रतिसाद आणि गर्दी ही बघण्याजोगी होती या संपूर्ण भागवत कथेचे नियोजन आयोजन उत्कृष्टपणे केल्यामुळे अनेकांनी मोहिनीराज देवस्थान ट्रस्ट 288 यांचे आभार मानले


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

