क्रिकेट

हरेगाव : माऊली प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दोन दिवसीय भव्य क्रिकेट स्पर्धा अनिल अण्णा भनगडे, दिलीप भाऊ त्रिभुवन व रमेश भाऊ भालेराव यांच्या सौजन्याने उत्साहात पार पडली. या स्पर्धेत १२ संघांनी सहभाग घेतला होता. पहिल्या दिवशी रामपूर इलेव्हन संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला.दुसऱ्या दिवशी आयकॉन–आयडॉल गटातील सामन्यांत परफेक्ट मोटर्स संघाने दमदार खेळ करत अंतिम सामना गाठला. महाअंतिम सामन्यात परफेक्ट मोटर्स संघाने रामपूर इलेव्हन संघावर मात करत प्रथम क्रमांकाचे ₹११,००० पारितोषिक व चषक पटकावला. बौद्धवासी शोभा ताई दादासाहेब हिवाळे यांच्या स्मरणार्थ श्री. शुभम दादासाहेब हिवाळे यांच्या तर्फे हे पारितोषिक देण्यात आले. द्वितीय क्रमांकाचे ₹७,००० पारितोषिक श्री. संदीप गाडेकर (अध्यक्ष, नेवासा तालुका पत्रकार संघ) यांच्या हस्ते रामपूर 11 या संघाला देण्यात आले. वैयक्तिक सौजन्य मध्ये सौरभ कुलकर्णी, टिल्लू भाऊ वाघचौरे, अमोल दुशिंग व दीपक घोडके यांचे सहकार्य लाभले.या पुढे ही असे दर्जेदार क्रिकेट सामने भरवण्यात येणार आहे अशी माहिती गिरीश परदेशी (ग्रामपंचायत सदस्य उंदीरगाव यांनी दिली)

क्रिकेट

या स्पर्धेत सोनू खंडागळे यांना मॅन ऑफ द सिरीज, विलास सातुरे यांना बेस्ट बॉलर तर कुमार यांना उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार देण्यात आला. स्पर्धेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
आयोजक समितीमध्ये पास्टर समीर आल्हाट, संदीप धनेधर, योगेश शिरसाठ मेजर, विशाल देवरे दाजी, सचिन शिंदे सर, शरद नागरगोजे सर, उमा भाऊ गायकवाड, पंकज थोरात, किरण धनेधर, किरण झाल्टे, सागर कुलथे, सागर चक्रनारायण, संकेत गायकवाड, किशोर मकासरे, अनंत वाहूळ व सोमा आगे यांनी मोलाचे योगदान दिले.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

क्रिकेट
क्रिकेट

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

क्रिकेट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!