
सोनई – कांगोणी रस्त्यावरील वडघुले वस्ती येथे मंगळवार ३ फेब्रुवारी रोजी रात्री जुन्या घरी आल्याच्या कारणावरून चुलता व चुलत भावांनी भावाची हत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी – सोनई पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश दत्तात्रय वडघुले (वय ३६) रा. वडघुले वस्ती, कांगोणी रोड, सोनई हा जुन्या घरी आल्याच्या कारणावरून आरोपींनी कोयता, लोखंडी पाईप, शेतीसाठी लागणारे खोरे व लाकडी ठोकळ्याने डोक्यात मारले. यात गणेश वडघुले हा ठार झाला. फिर्यादी हे त्यांचे भांडण सोडवण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांनाही मारहाण करून जखमी केले असल्यांची फिर्याद हिराबाई दत्तात्रय वडघुले (वय ६०) रा. वडघुले वस्ती यांनी सोनई पोलीस ठाण्यात दिली.

हिराबाई दत्तात्रय वडघुले यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी विठ्ठल रंगनाथ वडघुले, भगवान विठ्ठल वडघुले, संभाजी विठ्ठल वडघुले, गौरी भगवान वडघुले सर्व रा. कांगोणी रोड, सोनई यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), ११८(१), ११५ (२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे पुढील तपास करत आहे.
दरम्यान काल आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने विठ्ठल वडघुले, भगवान वडघुले, संभाजी वडघुले यांना दोन दिवस पोलीस कोठडी तर गौरी वडघुले हिस न्यायालयीन कोठडी देण्यात आली.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

