कारवाई
कारवाई

नेवासा – काळ्या काचा व ब्लॅक फिल्म लावलेल्या वाहनांचा वापर गुन्हेगारी कृत्यांसाठी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दल व प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाभर विशेष मोहिम राबविण्यात येत असून सहा दिवसांत ५६४ वाहनांवर कारवाई करून ५ लाख २७ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

कारवाई

केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार वाहनांच्या पुढील, मागील विंडस्क्रीन तसेच बाजूच्या खिडक्यांमधून किमान ७० टक्के प्रकाश पारदर्शकता असणे बंधनकारक आहे. वाहन उत्पादनाच्या वेळी बसविलेल्या काचांशिवाय नंतर कोणत्याही प्रकारची ब्लॅक फिल्म, रंगीत आवरण किंवा अन्य साहित्य चिकटविण्यास कायद्याने मनाई आहे. मात्र अनेक वाहनचालक नियमांचे उल्लंघन करत काळ्या काचा लावून वाहने चालवत असल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर काळ्या काचा व ब्लॅक फिल्म असलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करून त्या जागेवरच काढून टाकण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिले आहेत.

कारवाई

त्यानुसार २८ जानेवारीपासून जिल्ह्यात विशेष मोहिम सुरू करण्यात आली असून ही मोहिम पुढेही सुरू राहणार आहे. या कारवाईसाठी जिल्हा पातळीवर शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांची नियंत्रक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे, वाहतूक शाखा तसेच प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी व अंमलदारांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत शहर वाहतूक शाखेने सर्वाधिक २१२ वाहनांवर कारवाई करून २ लाख १९ हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

कारवाई
कारवाई

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

कारवाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!