गाडीची वेळ पाळण्यासाठी अधिकाऱ्यांची कानउघडणी
नेवासा-एसटी बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असा संदेश देण्याची गरज आहे. त्यासाठी अगोदर एसटीच्या वेळा पाळा, अशा शब्दांत अधिकाऱ्यांची कानउघडणी करत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यामुळे एसटीची भाडेवाढ टळली आहे. इंधन आणि गाडीच्या सुटे भागाची दरवाढ झाल्याने एसटी महामंडळाने प्रवासी भाड्यात दोन टक्के वाढ प्रास्तवित केली होती. यासंदर्भात काल सरनाईक यांनी मंत्रालयातील आपल्या दालनात घेतलेल्या आढावा बैठकीत महामंडळाचा दरवाढीचा प्रस्ताव फेटाळून लावत प्रशासनाला वक्तशीरपणा सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

