बहुतांशी सदस्यांची मात्र दांडीच ; ग्रामस्थांमध्ये नाराजी
नेवासा- तालुक्यातील चांदा ग्रामपंचायतचा पाच वर्षाचा कार्यकाळ येत्या आठवड्यात्त पूर्ण होत, असून विद्यमान पदाधिकाऱ्यांची शेवटची ग्रामसभा खेळीमेळीच्या बातावरणात पार पडली. मात्र, या शेवटच्या ग्रामसभेलाही अनेक सदस्यांनी दांडी मारल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली.
गत आठवड्यात कोरमअभावी तहकूब झालेली ग्रामसभा काल सकाळी साडेनऊ वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच रावसाहेब दहातोंडे होते. सुरुवातीला मागील सभेचे इतिवृत्त वाचन ग्रामविकास अधिकारी श्री. कदम यांनी केले. त्यानंतर ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चेला सुरुवात झाली. यावेळी अनेक ठराव संमत करण्यात आले. त्यामध्ये गेली पंधरा दिवसापासून गावात पिण्याचा पाणीपुरवठा बंद होता. यावर चर्चा झाली. तसेच बहुप्रतिक्षित जलजीवन मिशन अर्धवटच बंद पडल्याने यावरही ग्रामसभेत जोरदार चर्चा झाली. याबरोबरच लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभारावा, घंटागाडी रोज फिरत राहावी, चांदा
विद्यालयात क्रीडा शिक्षक नेमण्यात यावा, विहिरीवर बसवलेल्या सोलर पंप सततच नादुरुस्तः असल्याने संबंधित सोलर पंप ठेकेदारावर कार्यवाही करावी, गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशा विविध विषयांवर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली.

यावेळी अंगणवाडी पर्यवेक्षिका व सेविकांच्या व ग्रामपंचायतीच्या वतीने बालविवाह मुक्त अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी शपथ घेण्यात आली. त्याचबरोबर चांदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने टीबी मुक्त भारत करण्याची शपथही यावेळी उपस्थित पदाधिकारी व ग्रामस्थांनी घेतली.
यावेळी ग्रामसभेत एन. टी. शिंदे, प्राध्यापक भाबड, सुभाष शेंडे, अशोक गाढवे, कार्तिक पासलकर, देविदास पासलकर, शामराव पवार, किरण जावळे, श्री. गाढवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विविध सूचना केल्या. चांदा ग्रामपंचायतीने भालके वस्ती व लोहारवाडी परिसरातील नागरिकांसाठी बायपास रस्ता तसेच
चावडी सुशोभीकरण केल्याबद्दल ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सरपंच व पदाधिकाऱ्यांचे आभार ठराव संमत केला. सभेसाठी उपसरपंच गोरक्षनाथ दिवटे, ग्रामपंचायत सदस्य मार्केट कमिटीचे संचालक बाळासाहेब दहातोंडे, संतोष गाढवे, अरुण बाजारे, समद शेख, चांदा सोसायटीचे चेअरमन अरुण दहातोंडे, कामगार तलाठी बोरुडे, अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती दळे, अंगणवाडी सेविका, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटच्या ग्रामसभेचे आभार गावचे सरपंच रावसाहेब दहातोंडे यांनी मांनले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

