नेवासा : नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यांच्या कालावधीत शैक्षणिक सहलीचे आयोजन करतात. प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहली ऐतिहासिक, औद्योगिक, नैसर्गिक ठिकाणास भेटी देत देवदर्शन करतात. या सहली दरम्यान प्रवास, नाश्ता,जेवण,इतर खरेदीवर खर्च यामुळे कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. सहलीमुळे नेवासा आगारास १ कोटी २४ लाख ३६ हजार २२४ रूपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती आगार व्यवस्थापक प्रशांत ज्ञानदेव होले यांनी दिली.
नोव्हेंबर महिन्यात २९ हजार २१६ किलोमीटर प्रवास होऊन आगाराला १८ लाख ६९ हजार ८२४ रुपयांचे उत्पन्न मिळाले. डिसेंबर महिन्यात ८८ हजार ६६० किलोमीटरचा प्रवास होऊन आगाराला ५६ लाख ७४ हजार २४० रुपयांचे उत्पन्न मिळाले. जानेवारीत ७६ हजार ४४० किलोमीटर प्रवास होऊन आगाराला ४८ लाख ९२ हजार १६० रुपयांचे उत्पन्न मिळाले असे तीन महिन्यांच्या कालावधीत शैक्षणिक सहलीतून नेवासा आगाराला सव्वा कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले.

अहिल्यानगर विभागात नेवासा आगाराची कामगिरी चांगली आहे. डिसेंबर महिन्यात नेवासा आगारास १८ लाख ३३ हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळाला. सध्या पडताळणी दरम्यान बनावट आधार व दिव्यांग सवलतीचा लाभ घेणा-या सहा प्रवाशांचे बोगस ओळखपत्र जप्त केले आहे. पुणे व नाशिक येथून येणा-या बसेस बसस्थानकावर न जाता आगारात थांबतात अशा प्रवाशांकडून आलेल्या तक्रारीची दखल घेऊन बसेस बसस्थानकावर नेण्याचे आदेश चालक वाहकांना दिले. यामुळे आगाराचे उत्पन्नात वाढ होऊन प्रवाशांची गैरसोय दूर झाल्याचे आगार व्यवस्थापक होले यांनी सांगितले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

