मोहिनीराज

नेवासा-मोहिनीराज महाराज्यांच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर उद्याचा आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश पारित करण्यात आले आहे महाराष्ट्र भरातुन भाविक मोहिनीराज महाराजांच्या दर्शनासाठी येत असता. नेवासा तालुक्यातील आठवडे बाजार पैकी नेवासा खुर्द येथे मोठा बाजार हा दर रविवारच्या दिवशी भरवला जातो. सदरचा आठवडे बाजार हा यात्रा कालावधि मध्ये दिनांक 08/02/2026 रोजी असल्याने व आठवडे बाजार तळामध्ये आनंद मेळावा (रहाट पाळणे) असल्याने आठवडे बाजारासाठीच्या भाजीपाला, खाऊचे स्टॉल या करता जागेची कमतरता असल्याने दिनांक 08/02/2026 रोजीचा आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला आहे.

मोहिनीराज

श्री भगवान मोहिनीराज माहाराजांची यात्रा दिनांक 01/02/2026 ते 10/02/2026 या कालावधि मध्ये आयोजित केली आहे. सदर यात्रा सुरळीतपणे तसेच निर्विघ्नपणे पार पाडणेचे दृष्टीने दिनांक 08/02/2026 रोजी नेवासा खुर्द येथे मोठा आठवडे बाजार आहे, सदर यात्रेस महाराष्ट्र भरातुन भाविक दर्शनासाठी येत असल्याने त्यादिवशी वाहनांची आणि भावीकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेवासा खुर्द येथे रविवार दि.08/02/2026 रोजी आठवडेबाजार मुळे गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी वरील बाबींचा विचार करता श्री भगवान मोहिनीराज माहाराजांची यात्रा सुरळीत पार पाडणेसाठी रविवार दि.08/02/2026 रोजी नेवासा खुर्द गावाचे आठवडे बाजार बंद ठेवणे आवश्यक आहे

मार्केट अॅड फेअर अॅक्ट 1862 चे कलम 3, 4 व 5 मधील तरतुदी अन्वये असलेल्या अधिकाराचा वापर करुन नेवासा खुर्द गावात रविवार दि.08/02/2026 रोजी भरणारे आठवडे बाजार बंद ठेवणेबाबत आदेश उपविभागीय दंडाधिकारी सुधीर पाटील यांनी पारित केले आहेत

Kavya
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मोहिनीराज
मोहिनीराज

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मोहिनीराज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!