नेवासा -शहरातील सामाजिक कार्यकर्ते शांताराम गायके व विकास चव्हाण यांनी नेवासा नगरपंचायत समोरील स्वच्छतागृहाला अखेर लावले कुलूप नेवासा ग्रामपंचायत पासून तर आजतागायत दहा ते पंधरा वर्षाचा संघर्ष अजून थांबण्याचे नाव घेत नाही.
नगरपंचायतीच्या काळात सुद्धा नेवासा शहरातील व बाहेरून येणाऱ्या नागरिकांची सोय व्हावी म्हणून वेळोवेळी नेवासा शहरांमध्ये स्वच्छतासाठी व मुताऱ्यासाठी आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते शांताराम गायके यांनी नेवासा नगरपंचायत समोरील स्वच्छतागृहांमध्ये प्रवेश करताच त्यामध्ये तलावासारखी परिस्थिती आढळली सर्व स्वच्छतागृह अस्वच्छ होते सगळीकडेच मुतारीचे पाणी आणि घाण वास त्या ठिकाणी येत होता बाहेरून येणाऱ्या लोकांना आत मध्ये लघुशंका करण्यासाठी मोठ्या कसरतीने आत प्रवेश करावा लागत होता त्या ठिकाणी स्वच्छतागृहाची फरशी चोपडी असल्याने एखादा वयोवृद्ध किंवा एखादा व्यक्ती पडला तर त्याला दुखापत होऊन त्याला मोठी शारीरिक हानी होऊ शकते या कारणाने नेवासा शहरातील नेहमी अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते शांताराम गायके यांना ही परिस्थिती पटल्यामुळे त्यांनी नेवासा नगरपंचायत च्या स्वच्छता टाळे ठोकले
जर नेवासा नगरपंचायत ने याची दखल न घेतली तर पुढील आंदोलन तीव्र स्वरूपाचे करण्यात येईल याची सर्वस्व जबाबदारी नेवासा नगरपंचायत चे असेल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते शांताराम गायके व विकास चव्हाण यांनी दिला आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

