एसटी

वर्गवारीनुसार मासिक भत्त्यासाठी कर्मचारी आक्रमक

नेवासा – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांच्या मासिक भत्त्याबाबत राज्य सरकारने तातडीने निर्णय – घेतला नाही, तर राज्यभर एसटी बंद करण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे.

केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार राज्य सरकारच्या अर्थ विभागाने ११ डिसेंबर १९९८ रोजी एसटी महामंडळातील आगारांची शहरनिहाय अ१, अ,
ब १, ब २ अशी वर्गवारी केली. त्यानुसार अ १ वर्गवारीतील एसटी कर्मचाऱ्यांना दरमहा ३०० रुपये, अ वर्गातील कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपयांपेक्षा जास्त मूळ वेतन असल्यास कर्मचाऱ्यांना २४० रुपये मासिक भत्ता देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार पुणे विभागातील कर्मचारी अ वर्गात मोडत असल्याने त्यांना प्रतिमाह २४० रुपये मासिक भत्ता मिळणे अनिवार्य आहे. मात्र, गेल्या दोन दशकांपासून कर्मचाऱ्यांना जुन्या दरानुसार प्रतिमाह ६५ रुपये मासिक भत्ता देण्यात येत आहे, असा आरोप आरोप महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचे सचिव दिलीप परब आणि सागर दिघे यांनी केला आहे.

एसटी
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

एसटी
एसटी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

एसटी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!