दागिने

दोन अज्ञात महिलांवर गुन्हा दाखल

नेवासा – नाशिक येथे जाण्यासाठी नेवासा फाटा येथून नेवाशाकडे ऑटोरिक्षाने जात असताना प्रवासी महिलेच्या बॅगमधील पर्समधून ४ तोळे सोन्याचे दागिने दोन महिलांनी चोरुन नेल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. याबाबत नाशिकरोड येथील महिलेच्या फिर्यादीवरुन दोन अज्ञात महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अर्चना अंबादास थोरात (वय ४६) रा. नाशिकरोड यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, माझ्या भावाच्या नातीच्या लग्नासाठी मी नेवासा येथे आले होते. नेवासाफाटा येथील आंबेडकर चौक येथून मी व माझी बहिण कल्पना संजय रंधे ऑटो रिक्षामध्ये बसलो. रिक्षात बसल्यावर आमच्या जवळ दोन महिला

येवून बसल्या. त्यातील एकीने तोंडाला स्कार्फ बांधलेले होते. आम्ही नेवासा बसस्टॅण्डसमोर उतरलो. बसस्टॅण्ड येथे गेल्यावर मला माझ्या जवळील बॅगच्या चैन उघड्या दिसल्या. त्यावेळी मी माझी पर्स पाहिली असता पर्समध्ये ठेवलेले अडीच तोळे वजनाचा पोहेहार.व. दीड. तोळे वजनाचे नेकलेस चोरीस गेल्याचे दिसून आले. आम्ही आमच्याजवळ बसेल्या दोन महिलांचा स्टॅण्डवर व स्टॅण्डच्या बाहेर शोध घेतला असता त्या मिळून आल्या नाहीत. या दोन महिलांनीच माझ्या सामानाच्या बॅगमधील पर्समधून दागिने चोरुन नेले. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी दोन अज्ञात महिलांवर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

दागिने
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

दागिने
दागिने

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

दागिने

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!