त्रिलिंगी महादेव

नेवासा- तालुक्यातील सोनई येथील हेमाडपंथी त्रीलिंगी महादेव मंदिर परिसरात महेश तरुण मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त सोमवार ९ मार्च ते १६ मार्च पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. विश्वासराव महाराज गडाख यांच्या प्रेरणेने, युवा नेते उदयन गडाख व अक्षय महाराज धाकतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाचे हे ३० वे वर्ष आहे. पहाटे ४ ते ६ काकडा, सकाळी ७ वाजता ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ६ वाजता हरिपाठ व रात्री ९ वाजता कीर्तन होणार आहे. सोमवार ९ मार्च रोजी मयुरीताई महाराज जाधव, १० मार्च रोजी सचिन महाराज पुंड, ११ मार्च रोजी नंदकिशोर महाराज चव्हाण, १२ मार्च रोजी गीतांजलीताई महाराज झेंडे, १३ रोजी सोमनाथ महाराज पाटील, १४ मार्च रोजी रामेश्वर महाराज राऊत, १५ मार्च योगेश महाराज पवार यांची कीर्तने होणार आहेत. १५ रोजी सकाळी १० वाजता पारायणाची सांगता व पूजन होऊन दुपारी तीन वाजता ज्ञानेश्वरी ग्रंथाची शोभा मिरवणूक निघणार आहे. १६ मार्च रोजी लक्ष्मण महाराज कदम (आळंदी), यांचे काल्याचे कीर्तन होईल व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.

Kavya
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

महादेव
महादेव

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

महादेव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!