अमेरिकेचा धुव्वा उडवत २९ धावांनी विजय
नेवासा- आयसीसी टी-२० विश्वचषकाचा बिगुल शनिवारी वाजला आणि पहिल्याच सामन्यात भारताने आपल्या घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर विजय मिळवला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्या सामन्यात अमेरिकेला २९ धावांनी पराभूत केले आहे. यासह स्पर्धेची सुरुवात विजयाने केली आहे. एक क्षण हा सामना भारत गमवेल असं वाटत होते. पण भारताने जबरदस्त कमबॅक केले. भारताने दिलेल्या १६१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अमेरिकेचा संघ निर्धारित षटकांत १३२ धावांपर्यंतच मजल मारू शकला. यासह भारताने या स्पर्धेतील आपले पहिले दोन गुण खात्यात जमा केले.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ९ विकेट्सच्या मोबदल्यात १६१ धावा केल्या. मात्र, भारताची सुरुवात अत्यंत खराब ठरली. सलामीवीर अभिषेक शर्मा पहिल्याच चेंडूवर आऊट झाला.

यानंतर ईशान किशन आणि तिलक वर्मा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी काही आकर्षक फटकेही मारले, पण पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात शेंडली वान शल्कविकने सामन्याचं चित्रच बदलून टाकले. षटकाच्या दुसर्या चेंडूवर ईशान किशन २० धावा करत बाद झाला. पुढच्या दोन चेंडूवर तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांनाही माघारी पाठवले. यानंतर रिंकू सिंग आणि हार्दिक पांड्यांकडूनही अपेक्षित कामगिरी झाली नाही. अक्षर पटेल आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी सातव्या विकेटसाठी ४१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.
१० चौकार आणि ४ षटकार लगावले. सूर्यकुमार यादवने ४९ चेंडूमध्ये नाबाद ८४ धावांची जबरदस्त खेळी केली. या खेळीत त्याने लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकन संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. पॉवरप्लेमध्येच यूएसएने तीन महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या. येथून मिलिंद कुमार आणि संजय कृष्णमूर्ती यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केला. मिलिंद कुमारने १०० स्ट्राईक रेटने ३४ धावा केल्या, ज्यात ३ चौकार आणि १ षटकार यांचा समावेश होता. मात्र, वरुण चक्रवर्तीने मिलिंदचा अडथळा संपवला. यानंतर मैदानावर फिरकीपटू अक्षर पटेलचा जादू पाहायला मिळाला.
अक्षरने सलग चेंडूवर संजय कृष्णमूर्ती आणि हरमीत सिंग यांना बाद करत अमेरिकन डावाची कणा मोडली. संजयने २ चौकार आणि १ षटकारासह ३१ चेंडूत ३७ धावा केल्या, तर हरमीत सिंगला खातेही उघडता आलं नाही. अखेरीस अमेरिकन संघ भारतीय गोलंदाजीपुढे टिकू शकला नाही आणि डाव १३२ धावांवर आटोपला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

