परळी रेल्वे

कुकाणा – शेती, उद्योग, व्यापार व पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या बेलापूर-परळी रेल्वे मार्गासाठी जिल्ह्यातील सर्व राजकीय नेते मंडळी व लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे, असे आवाहन नेवासाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केले.

परळी रेल्वे

नेवासा शेवगाव-गेवराई मार्गे बेलापूर (श्रीरामपूर) ते परळी रेल्वे मार्गाला तात्पुरती स्थगिती देत २०२२ पासून मंजुरीसाठी प्रलंबित ठेवल्याने केंद्र व राज्य शासनाचे विरोधात बेलापूर-परळी रेल्वे कृती समितीच्या वतीने रितेश विजयकुमार भंडारी, रज्जाक निजामशा इनामदार व सुरेश वसंतराव नरवणे यांनी सोमवार दि.९ पासून कुकाणा येथे ग्रामपंचायत स्टेजवर आमरण उपोषण सुरू केले आहे. माजी आ. मुरकुटे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला, त्यावेळी ते बोलत होते. दत्तात्रय खाटीक, बाबुलाल पटेल, बालम टाकळीचे माजी सरपंच विक्रम बारवकर, शरद गरड, भाऊसाहेब फुलारी, अण्णासाहेब गव्हाणे, वसंतराव देशमुख, शेतकरी संघटनेचे नेते मच्छिंद्र आरले, नामदेवराव उंडे, शहादेव मुंगसे, प्रभाकर खंडागळे, पांडुरंग कावरे, मनोज गांधी, संपतशेठ गांधी, विष्णू गायकवाड यावेळी उपस्थित होते.

परळी रेल्वे

श्री. मुरकुटे पुढे म्हणाले, बेलापूर-परळी हा १९२१ साली ब्रिटिश कालीन मंजूर झालेला रेल्वे मार्ग आहे. त्यानंतर १०० वर्षे झाले, बेलापूर (श्रीरामपूर), नेवासा, शेवगाव, गेवराई, माजलगाव व परळी तालुक्यातील शेतकरी, व्यापारी, पर्यटक, उद्योजकांसाठी महत्त्वाचा असलेला रेल्वे मार्ग आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये कारखाने आहेत, या रेल्वेमार्गाला क्रॉस होणारे राष्ट्रीय महामार्ग आहेत. या रेल्वे मार्गाचे काम होणार त्या ठिकाणी जमीन अधिग्रहण होऊन भरावाचे काही काम झालेले आहे. १९२१ ते १९४० च्या ५० शतकामध्ये स्वातंत्र्यानंतर या रेल्वेमार्गाला शासनाकडून कुठली तरतूद झाली नाही. रेल्वे कृती समितीने सातत्याने उपोषण व पाठपुरावा केल्याने खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी हा प्रश्न केंद्राकडे अधिवेशनामध्ये मांडला आणि त्याच्यानंतर
सर्वेक्षण केंद्र शासनाचा निर्णय झाला. तो निर्णय झाल्यानंतर देखील पुन्हा ५ वर्षे गेले. त्या सर्वेक्षणामध्ये थोडीशी तांत्रिक चूक अधिकाऱ्यांकडून झाल्याने तो मार्ग मागे पडला.

परळी रेल्वे

२०१५-१६ मध्ये पुन्हा उपोषण केले. त्यावेळी आमदार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे हा विषय आपण ठेवला. त्यांनी केंद्र व राज्य शासनाची जी ५०/ ५०/५० टक्केची भागीदारी असते त्यातला सहभाग असतो, त्यातील राज्य शासनाच्या ५० टक्के घेण्यासंदर्भात राज्य शासनाचे शिफारसपत्र घेतले.

केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी बेलापूर परळी मार्ग आहे, हा फिजिबल नाही, त्यातून जे आर्थिक उत्पन्न मिळेल त्या उत्पन्नात ते बसत नाहीत, म्हणून या मार्गाला स्थगिती दिलेली आहे. आपला हा बेलापूर-परळीचा मार्ग तोट्याचा नसून फायद्याचाच आहे. मात्र देशातील राज्यातील इतर काही रेल्वे मार्ग पूर्णतः तोट्यामधले असताना देखील ते मंजूर झालेले आहेत. केंद्र सरकारने घेतलेले निर्णय हे रेल्वे मार्गासाठी कसे अन्यायकारक आहेत. हे सातत्याने ते निदर्शनात आणून दिलेले, परंतु त्यावरती कुठेही काही तोडगा न निघल्याने रेल्वे कृती समितीला उपोषणाशिवाय पर्याय नव्हता, म्हणून हे उपोषण करावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी अहिल्यानगर येथील रेल्वे गोपनीय शाखेचे अधिकारी सुनील कांबळे व सचिन नागरगोजे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी संवाद साधला.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

परळी रेल्वे
परळी रेल्वे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

परळी रेल्वे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!