महाशिवरात्री

नेवासा -तालुक्यातील कुकाणा येथील श्री क्षेत्र ओंकारेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने यात्रोत्सव शनिवार दि.१४ फेब्रुवारी पासून प्रारंभ होत आहेत्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती यात्रोत्सव समितीने दिली.

या यात्रा उत्सावाला याच वर्षापासून प्रारंभ करण्यात आला आहे. हा यात्रोत्सव शनिवार ते सोमवार असे तीन दिवस असून शनिवारी (दि. १४) पहिल्या दिवशी सायंकाळी सहा वाजता प्रवरासंगम येथून भाविकांनी पायी आणलेल्या कावडीचे सवाद्य हिंदू राजा बाहुबली हनुमान महाकाली अघोरी टिम मिरवणुकीसोबतच आकर्षण ठरणार आहे. या दरम्यान रात्री ९ वाजता रंगीबेरंगी शोभेची दारु, तोफांची सलामी व फटाक्यांची आतषबाजी भाविकांना पर्वणी ठरणार आहे.

महाशिवरात्री

महाशिवरात्रीच्या मुख्य दिवशी दि. १५ रोजी श्रीक्षेत्र ओंकारेश्वर मंदिरात पहाटे २ वाजता रुद्राभिषेक, सकाळी ७वाजता आरती व साडेआठ वाजता भास्करगिरी महाराज, देविदास महाराज म्हस्के व सुनिलगिरी महाराज यांच्या हस्ते मंदिर परिसरात ध्वजारोहन होईल. ९ ते ११ या वेळेत आळंदी येथील डॉ. रविंदास महाराज शिरसाठ यांचे कीर्तन होईल. त्यानंतर उपस्थित भाविकांना फराळ महाप्रसाद देण्यात येणार आहे. रात्री ९ वाजता एकतारी भजनाचा कार्यक्रम आणि सोमवार दि. १६ रोजी दुपारी कुस्त्यांचा हगामा होणार आहे. यावेळी प्रसिद्ध मल्ल हजेरी लावणार आहेत.

यात्रा उत्सवासाठी रहाट पाळणे, ब्रेक डान्स, खेळणी, हलवाई, मिठाई दुकानदार यासह विविध खेळ व स्टॉल धारकांनी उपस्थित रहावे. धार्मिक कार्यक्रम व यात्रा उत्सवाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन यात्रोत्सव समिती, भजनी मंडळ व ग्रामस्थांनी केले आहे.

Kavya
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

महाशिवरात्री
महाशिवरात्री

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

महाशिवरात्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!