चैन स्नॅचिंग

नेवासा- शहरात घडलेल्या चैन स्नॅचिंगच्या प्रकारात नेवासा तालुका ऑटो रिक्षा संघटना यांच्या पदाधिकारी व चालकांच्या सतर्कतेमुळे एका संशयित महिलेला पकडण्यात यश आले असून, वृद्ध महिलेचे गळ्यातील सोनेरी गंठण सुरक्षित परत मिळाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनेरी गंठण अचानक गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी तात्काळ रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना व चालकांना याबाबत माहिती दिली व मदत मागितली.

चैन

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रिक्षा संघटनेच्या सदस्यांनी तत्परता दाखवत परिसरात संशयित महिलेचा शोध घेतला. संवाद साधून तिची चौकशी केली असता, संबंधित महिलेच्या पिशवीतून वृद्ध महिलेचे सोनेरी गंठण हस्तगत करण्यात आले. त्यानंतर पुढील कारवाईसाठी संबंधित महिलेला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

रिक्षा संघटनेच्या या सतर्क व धाडसी कृतीचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे. त्यांच्या वेळेवर केलेल्या प्रयत्नांमुळे एक मोठा गुन्हा उघडकीस आला आणि वृद्ध महिलेला तिचे दागिने सुरक्षित परत मिळाले.

नेवासा तालुका ऑटो रिक्षा संघटनेने समाजहितासाठी सदैव तत्पर राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Kavya
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

चैन
चैन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

चैन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!