महाशिवरात्री

भानसहिवरा (वार्ताहर) :- नेवासा तालुक्यातील हंडीनिमगाव व सुरेशनगर गावच्या मध्यावर असलेल्या श्री क्षेत्र त्रिवेणीश्वर महादेव देवस्थान येथे 
महाशिवरात्री उत्सवाला संत महंतासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत धर्मध्वज पूजनाद्वारे ध्वजारोहण करून भक्तिमय वातावरणात बुधवारी दि.११ फेब्रुवारी रोजी प्रारंभ करण्यात आला. “हर हर महादेव”,”त्रिवेणीश्वर भगवान की जय”अशा जयघोषाने परिसर दुमदुमला होता
     यावेळी त्रिवेणीश्वर देवस्थानच्या मुख्य प्रवेशद्वारापासून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत संत महंतांसह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सदर मिरवणुकीत उस्थळ दुमाला येथील किसनगिरी बाबा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे लेझीम व झांजपथक त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांचे सैनिकी बँड पथक, झांज पथक सहभागी झाले होते. डोक्यावर तुळशी कळस घेतलेल्या बालिका व महादेव पार्वतीची वेशभूषा केलेले बालके  मिरवणुकीचे आकर्षण ठरले होते.

Kavya


      मिरवणुकीचा समारोप त्रिवेणीश्वर मंदिर प्रांगणात झाल्यानंतर मंदिर प्रांगणातील ध्वजस्तंभाजवळ स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज, नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे महंत हभप देविदासजी महाराज म्हस्के शास्त्री, त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत रमेशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते व पारायण व्यासपीठ प्रमुख रामनाथ महाराज पवार, लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे, बदाम महाराज पठाडे यांच्या उपस्थितीत धर्मध्वज पूजन करण्यात येऊन ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी झालेल्या धार्मिक कार्याचे पौरोहित्य भेंडा येथील वेदशास्त्रसंपन्न आचार्य गणेशदेवा कुलकर्णी यांनी केले.
         यावेळी त्रिवेणीश्वर देवस्थानच्या सभामंडपात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत रमेशानंदगिरी महाराज यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. सहा दिवस चालणाऱ्या महाशिवरात्री उत्सवासाठी तन मन धनाने सहकार्य करावे व या सोहळयातील आनंद द्विगुणित करावा असे आवाहन यावेळी बोलतांना केले.
              या प्रसंगी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज व महंत देविदास महाराज म्हस्के शास्त्री यांनी अजानबाहू योगीराज भक्त प्रल्हादगिरी महाराज व त्रिवेणीश्वरचा महिमा विषद करून सोहळयाला शुभाशीर्वाद दिले. यावेळी प्रल्हादगिरी बाबांच्या नवीन मूर्तीसाठी देणगी देणारे सेवेकरी सुवर्णकार विजय दहिवाळकर, दत्तात्रय पिसाळ, विजय देशमुख यांचा तसेच मिरवणुकीत सहभागी झालेल्या विद्यार्थी व शिक्षकांचा प्रातिनिधिक स्वरुपात
स्वामींच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

महाशिवरात्री


    झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले. महाशिवरात्री सोहळयाच्या शुभारंभ प्रसंगी सेवेकरी बन्सीभाऊ आगळे,विजय आगळे,विलास ताके,हरिभाऊ वालतुरे यांच्या वतीने उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
                 यावेळी संभाजीनगर भक्त मंडळाचे सदस्य सेवेकरी, हंडीनिमगाव व सुरेशनगर येथील ग्रामस्थ, विविध संस्थेचे पदाधिकारी,महाशिवरात्री उत्सवासाठी नियोजन करणारे त्रिवेणीश्वर भक्त मंडळाचे जेष्ठ मंडळी, युवा सेवेकरी, तरुण मंडळाचे कार्यकर्ते पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाशिवरात्री
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

महाशिवरात्री
महाशिवरात्री

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

महाशिवरात्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!