मका

जिल्हा मार्केटिंग फेडरेशनची मका खरेदी सुरू

नेवासा-राज्य शासनाकडून अंत्योदय व प्राध्यान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना गहू, तांदळाचे नियमित वाटप केले जाते. परंतु मार्च महिन्यापासून रेशनकार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानातून तांदळाऐवजी गव्हासोबत मका मिळणार आहे.

जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यात आठ केंद्रावर मका खरेदी करण्यात येत आहे. ही खरेदी केलेली मका रेशनदुकानातून लाभार्थ्यांना दिली जाणार आहे. आतापर्यंत १५ हजार क्विंटल मका खरेदी करण्यात असून २८ फेब्रुवारीपर्यंत खरेदी सुरु राहाणार आहे. खरेदी करण्यात आलेली संपूर्ण मका लाभार्थ्यांना दिली जाणार असल्याने पुढील तीन महिने रेशनवर गव्हासोबत मका मिळण्याची शक्यता आहे.

Kavya

अंत्योदय योजनेतील कुटुंबांना १० किलो मका व ११ किलो गहू मिळणार आहे. तर प्राध्यान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन किलो गहू व एक किलो मका दिली जाणार आहे. जिल्ह्यात अंत्योदय योजनेचे ८७ हजार ६४ कार्डधारक आहेत, तर ३ लाख ८६ हजार ३४ लाभार्थी आहेत. प्राधान्य कुटुंब योजनेचे ६ लाख ३७ हजार ११४ रेशनकार्डधारक आहेत, तर २५ लाख ६३ हजार ९७१ लाभार्थी आहेत. जिल्ह्यात नगर, घारगाव,श्रीगोंदा, घोगरगाव, मिरजगाव, शेवगाव, पाथर्डी व कोपरगाव येथील फेडरेशन केंद्रावर मका खरेदी केली जात आहे. तर जामखेड व संगमनेर येथील केंद्रावर शेतकऱ्यांची नोंदणी झालेली नाही.

दक्षता पथक स्थापन

फेडरेशन केंद्रावर शेतकऱ्यांकडून मका खरेदी करण्यात येत आहे. संबंधित तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखालील दक्षता पथकाला फेडरेशन केंद्राच्या तपासणीचे अधिकार देण्यात आले आहेत. गैरप्रकार आढळून आल्यास कारवाई केली जाणार आहे.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मका
मका

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!