पुरस्कार

सोनई : यशवंत सामाजिक प्रतिष्ठान, सोनई यांच्या वतीने आयोजित कृतज्ञता पुरस्कार सोहळ्याच्या नियोजनासाठी माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या बैठकीस सोनईतील तरुण मित्रमंडळाचे सदस्य, व्यापारी बांधव, शेतकरी, दुग्ध उत्पादक, विविध संस्थांचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, यशवंत प्रतिष्ठानचे सदस्य तसेच सोनईकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शनिवार, दि. १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता मुळा पब्लिक स्कूल, सोनईच्या प्रांगणात ज्येष्ठ साहित्यिक मा. खा. यशवंतराव गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. संदीप वासलेकर, राजीव खांडेकर व रंगनाथ पठारे यांना कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
कृतज्ञता पुरस्काराच्या निमित्ताने देशभरातील नामवंत व्यक्तींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उपक्रम असून, हा सन्मान सोहळा म्हणजे तरुणाईने व्यक्त केलेली कृतज्ञता आहे, असे मत माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी व्यक्त केले. तसेच या सोहळ्यास तालुक्यातील मित्रपरिवार, जिल्हाभरातील मित्रपरिवार, नातेवाईक व कुटुंबीयांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीत प्रस्ताविक बाबा अनारसे यांनी केले. पत्रकार विनायक दरंदले व अरुणराव घावटे यांनी मनोगत व्यक्त केले.

पुरस्कार
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पुरस्कार
पुरस्कार

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पुरस्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!