सोनई – नेवासा तालुक्यातील सोनई येथे दुपारच्या सुमारास अशोका फुटवेअर दुकानात घडलेल्या वादातून एका २१ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. ११ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.४५ वाजता सोनई येथील अशोका फुटवेअर दुकानात ही घटना घडली. प्रेम जालींदर अनारसे (वय २१, रा. घोडेगाव रोड, सोनई, ता. नेवासा) यांनी तक्रार दिली. आरोपी जेम्स साळवे, विकास साळवे, सिद्धेश उनवणे (सर्व रा. सोनई) तसेच अन्य तीन अनोळखी तरुणांनी एकत्र येत फिर्यादी व त्यांच्या भावास शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. तू त्या दिवशी सिद्धेशच्या अंगावर पाणी का उडवले? असा जाब विचारत जेम्स साळवे याने हातातील चाकूने फिर्यादीच्या पाठीवर वार करून जखमी केले. जखमी अवस्थेत फिर्यादी दुकानाबाहेर पळत असताना सिद्धेश उनवणे याने लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. पुन्हा आमच्या नादी लागलात तर जेलमधून सुटल्यानंतर मित्रांना बोलावून एकेकाला जिवे मारू, अशी धमकी दिली आहे. जमखींवर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे. या घटनेप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बी. एम. लबडे हे करीत आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

