सोनई येथील मुळा एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ फार्मसी सोनई या महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत अंतर महाविद्यालयीन विद्यार्थी सहभाग परिसंवाद सेमिनार नुकताच उत्साहात संपन्न झाला. मुळा एज्युकेशनचे सहसचिव तथा प्राचार्य डॉ. विनायक देशमुख व उपप्राचार्य डॉ. विलास घावटे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेसाठी डॉ. मच्छिंद्र वर्पे डॉ. हरिभाऊ खेडेकर डॉ.संभाजी दराडे व डॉ. संदीप खेडकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा पाया म्हणून महाविद्यालयातील युवक पिढीला समाजातील ज्वलंत समस्यावर विचार करण्यास प्रवृत्त करून त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढविण्याच्या हेतूने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व सोनई फार्मसी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या परिसंवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात विविध महाविद्यालयाच्या पदवीसाठी 168 व पदव्युत्तर पदवीसाठी 108 इतक्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत पदवी विभागात कॉलेज ऑफ फार्मसी सोनई महाविद्यालय प्रथम, आबासाहेब काकडे फार्मसी महाविद्यालय बोधेगाव द्वितीय व परिक्रमा फार्मसी महाविद्यालय काष्टी तृतीय तसेच पदव्युत्तर पदवी विभागात कॉलेज ऑफ फार्मसी सोनई प्रथम, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनई द्वितीय व तृतीय क्रमांकाचे या महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी रोख पारितोषिक मिळवले. स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे उपाध्यक्ष मा.उदयन गडाख, सचिव उत्तमराव लोंढे यांनी अभिनंदन केले. सेमिनार यशस्वी ते करिता डॉ. रामदास पांढरे, प्रा. प्राची वीरकर, प्रा. प्रतिभा भुजाडी यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर प्रतिनिधींनी प्रयत्न केले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.


