विल्हेवाट

नेवासा-नेवासे नगरपंचायतचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांच्या संकल्पनेतून नेवासे शहरातील विविध परिसरात राबविण्यात आलेल्या मासिक स्वच्छता अभियानात तीन टन कचऱ्याची इतरत्र विल्हेवाट लावण्यात आली. या अभियानात सामाजिक क्षेत्रात काम करणारे स्वयंसेवक सहभागी झाले होते.बाजार तळ परिसर, जिल्हा बँक परिसर, संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर रोड परिसर याठिकाणी जाऊन स्वच्छतादूतांनी अभियानात सहभाग नोंदवला. नगराध्यक्ष घुले या अभियानात हातात फावडे, कुदळ घेऊन सहभागी झाले होते. सामाजिक कार्यकर्ते अमृत फिरोदिया, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह सतीश मुळे, अनंता नळकांडे, ज्येष्ठ कार्यकर्ते गफूर बागवान, रामभाऊ केंदळे, व्यापारी बालेंद्र पोतदार, अब्बास बागवान, हमीद बागवान, संदीप आलवणे, युवा कार्यकर्ते संदीप भांड, आकाश देशमुख, योगेश आलवणे यांनी देखील सहभाग नोंदवला. तीन कचरा गाड्या संकलन करण्यासाठी तैनात होत्या. नेवासा भूमीचे वैभव वाढीसाठी नागरिकांनी दर महिन्याच्या १२ तारखेला सकाळी विविध परिसरात होणाऱ्या स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन नगराध्यक्ष घुले यांनी केले आहे.

विल्हेवाट
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

विल्हेवाट
विल्हेवाट

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

विल्हेवाट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!